‘खोक्याविना महाआघाडी सरकारचा ओके’ कार्यक्रम केला : आ. शहाजीबापू पाटील

‘खोक्याविना महाआघाडी सरकारचा ओके’ कार्यक्रम केला : आ. शहाजीबापू पाटील

कुरूंदवाड; पुढारी वृत्तसेवा :  अडीच वर्षांपूर्वी भाजपबरोबर युती करून निवडून आलो होतो. देवेंद्र फडणवीस यांना धोका देत राष्ट ?वादी- काँग्रेसबरोबर महाआघाडीचे पाप केले होते. पुन्हा अडीच वर्षांनंतर फडणवीस यांच्याबरोबर युती करत आम्ही 'खोक्याविना महाआघाडी सरकारचा ओके' कार्यक्रम केला, अशी टीका सांगोल्याचे शिंदे गटाचे आ. शहाजीबापू पाटील यांनी येथे केली. मात्र यावर 50 खोके आणि ओके अशी लाजिरवाणी टीका माजी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करत आहेत. या टीकेला आम्ही फारसं महत्त्व देत नाही, असेही ते म्हणाले. कुरूंदवाड
येथे एका कार्यक्रमासाठी आले असता ते बोलत होते.

आ. पाटील म्हणाले, 1995 साली महाराष्ट्रात भाजप-सेना युतीचे सरकार असताना आपले कार्यकर्ते आणि पदाधिकारी सोडून जाऊ नयेत यासाठी माजी कृषिमंत्री शरद पवार प्रत्येक महिन्याला हे सरकार पडणार, अशी घोषणा करत होते. तरीही युती सरकारने 5 वर्षे पूर्ण केली. आता ठाकरेही त्यांच्या पावलावर पाऊल टाकत आपले कार्यकर्ते आपल्याजवळ राहावेत यासाठी शिंदे-फडणवीस सरकार पडणार, कामाला लागा, अशी वक्तव्य करत आहेत. ते शरद पवारांपेक्षा वेगळे काही बोलत नाहीत.

उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभा संपर्कप्रमुखांची बैठक बोलवून राज्यात लवकरच मध्यावधी निवडणुका लागणार असून कामाला लागा, असा आदेश दिल्याचा धागा पकडत आ. पाटील म्हणाले, बळीराजाचं हित जोपासणारं हे सरकार आहे. परतीच्या पावसाने झालेल्या शेतकर्‍यांचे नुकसानीचे लवकरच पंचनामे करून केंद्र सरकारच्या मदतीने जास्तीत जास्त शेतकर्‍यांना मदत मिळवून देण्याचा मानस या सरकारचा आहे. प्रोत्साहनपर
अनुदानही लवकरच शेतकर्‍यांना देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news