कोल्हापूरात वेश्या व्यवसायासाठी मुली पुरविणार्‍यास अटक

कोल्हापूरात वेश्या व्यवसायासाठी मुली पुरविणार्‍यास अटक

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  वेश्या व्यवसाय चालवण्यास सहाय्य करणार्‍या आणि रिक्षातून वेश्या व्यवसायासाठी मुली पुरवणार्‍या संशयित हनुमंत खर्जे याला अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कक्षाकडून अटक करण्यात आली. त्याला शाहूपुरी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

जिल्ह्यात चोरीछुपे वेश्या व्यवसाय सुरू आहे. या व्यवसायावर कारवाई करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी गुन्हे आढावा बैठकीत प्रभारी पोलिस अधिकार्‍यांना दिले. त्यानुसार वेश्या व्यवसायावर कारवाई सुरू करण्यात आली. दरम्यान, शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वटेश्वर महादेव मंदिरानजीक असलेल्या एका हॉटेलवर छापा टाकून तेथील वेश्या व्यवसाय प्रकरणी काही संशयितांना अटक केली होती. त्यावेळी रिक्षा व्यावसायिक आणि एजंट म्हणून काम करणारा खर्जे पळून गेला होता. त्याचा शोध अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे सहायक पोलिस निरीक्षक श्रद्धा आंबले, उपनिरीक्षक पल्लवी चव्हाण, सहायक फौजदार रवींद्र गायकवाड आदी पोलिस कर्मचार्‍यांकडून शोध सुरू होता. दरम्यान, गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार पुणे-बंगळूर महामार्गावरील कासारवाडी फाटा येथे एका हॉटेलजवळ संशयित हनुमंत खर्जे हा येणार असल्याची माहिती मिळाली. त्या ठिकाणी सापळा रचून त्याला अटक केली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news