कोल्हापूरकरांना दरमहा 600 रुपयांत घरगुती गॅस

कोल्हापूरकरांना दरमहा 600 रुपयांत घरगुती गॅस

कोल्हापूर; डॅनियल काळे :  कोल्हापूर शहरातील प्रत्येक कुटुंबाला दरमहा सहाशे रुपयांत घरगुती गॅस मिळणार आहे. यामुळे प्रत्येकाचे दरमहा 500 रुपये वाचणार आहेत. केंद्र सरकारच्या योजनेमुळे हे शक्य होणार आहे. घरगुती गॅस वितरणासाठी शहरात 72 किलोमीटर मुख्य पाईपलाईन आणि घरोघरी गॅस पोहोचविण्यासाठी 273 किलोमीटरचे पाईपलाईनचे जाळे विणले आहे. त्यासाठी 28 हजार ग्राहकांनी कंपनीकडे नोंदणी केली आहे. शहराच्या उर्वरित भागात पाईपलाईन टाकण्यासाठी एचपी ऑईल कंपनीने महापालिकेकडे परवानगी मागितली आहे. त्यांनतर संपूर्ण शहरात गॅस पाईपलाईनचे काम केले जाणार आहे.

केंद्र सरकारने नागरिकांना सुरक्षित गॅस उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना आखली होती. ती आता सुरू झाली आहे. केंद्राने दाभोळ ते बंगळूर अशी मोठी पाईपलाईन योजना आखली होती. बंगळूरला जाणारी पाईपलाईन कोल्हापूरजवळून जाते. हातकणंगले तालुक्यातील मौजे वडगाव येथे या योजनेचे मुख्य केंद्र आहे. तेथूनच कोल्हापूरसाठी कनेक्शन मिळाले आहे.

मुक्‍तसैनिक वसाहतमधील500 कुटुंंबांकडून वापर सुरू

मुक्‍तसैनिक वसाहतमध्ये या योजनेतून पुर?वठा सुरू झाला आहे. 500 कुटुंबांकडून त्याचा वापर केला जात आहे.

सीएनजी गॅस पंपही बसविले

वाहनांमध्ये गॅस भरण्यासाठी शहरात चार ठिकाणी सीएनजी गॅस पंप सुरू केले आहेत. नागरिकांना येेथेदेखील कमी पैशांत 94 रुपयांत 1 किलो गॅस मिळणार आहे. शहरातील वाशी नाका, राजारामपुरी, शिवाजी उद्यमनगर, देवकर पाणंद येथे हे पंप सुरू करण्याचे काम सुरू आहे.

पूर्णपणे सुरक्षित

या पाईपलाईनच्या सुरक्षिततेसाठी आयसोलेशन वॉल केली आहे. गॅस गळतीची सूचना स्काडा सिस्टीमद्वारे कंपनीला लगेच मिळणार आहे. हा गॅस हवेपेक्षाही हलका असल्याने तो लगेचच हवेत मिसळणार आहे. गॅस अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडच्या देखरेखीखाली हे काम सुरू आहे.

ई वॉर्डात गॅस पुरवठा होणार

पहिल्या टप्प्यात नागाळा पार्क, ताराबाई पार्क, जाधववाडी, मुक्‍तसैनिक वसाहत, मार्केट यार्ड, रूईकर कॉलनी, रुक्मिणीनगर, कदमवाडी, पाटोळेवाडी, सर्किट हाऊस परिसर, राजारामपुरी, शिवाजी पार्क, शाहूपुरी या ई वॉर्ड परिसरात पाईपलाईनचे काम पूर्ण झाले असून, गॅसपुरवठा सुरू होणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news