कोल्हापूर : ‘सीए’ परीक्षेत 51 जण ठरले अव्वल

कोल्हापूर : ‘सीए’ परीक्षेत 51 जण ठरले अव्वल
Published on
Updated on

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  चार्टर्ड अकौंटंटस् कोर्सच्या अंतिम परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. यात कोल्हापुरातील आतापर्यंतचे सर्वाधिक 51 विद्यार्थी 'सीए' परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. कोल्हापूर विभागातून सिद्धार्थ पाटणकर यांनी प्रथम क्रमांक मिळवला. स्वस्तिका भिवटे द्वितीय तर अवधूत भोसले यांनी तृतीय क्रमांक मिळवला. सचिन पंजवाणी, तेजल बल्लाळ यांनी चौथा व पाचवा क्रमांक पटकावला.

दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकौंटंटस् ऑफ इंडिया यांच्या वतीने दरवर्षी मे व नोव्हेंबर महिन्यात 'सीए'ची परीक्षा घेतली जाते. चार्टर्ड अकौंटंट कोर्स विश्वस्तरीय मान्यता असलेला कोर्स असल्याने त्याची परीक्षा अवघड समजली जाते. यंदा नोव्हेंबर 2022 मध्ये झालेल्या परीक्षेत कोल्हापूरमधून 307 विद्यार्थी बसले होते. यातून 51 विद्यार्थी सीए झाले.

अपूर्व काकिर्डे, प्रियांका भोसले, हर्षला पाटील, पूजा भोजे, ऋतुराज गोंधळेकर, प्राजक्ता कदम, रसिका रायकर, आदर्श रोट्टी, धीरज हुजरे, नूरमहंमद ट्रेनर, नेहा कलघटकर, नंदिता मेनन, निवेदिता माने, ऋषीकेश भोसले, प्रीती प्रभू, दर्शित राठोड, ईशा भाटवडेकर, प्रीतम कांबळे, रिद्धी जामसांडेकर, श्रिया वायकूळ, पुष्कर जोशी, अक्षय पंजवाणी, सागरिका तनवानी, देविदास आजगावकर, राहुल पाटील, निखिल सरवटे, सायली कांबळी, सुशांत गाट, वेदेश सांगवडेकर, पायल गांधी, मयुरी साळोखे, रोहित कुंभोजे, श्रेया चौगुले, सीमरन चोइथानी, विनित हराळे, पूर्वा महाजन, सौरव पाटील, निखिल जोशी, विजय चितारी, ऋषीकेश पोकळेकर, करण कोळी, अभिषेक देसाई, अभिषेक सिंग, कविता माळी, ऐश्वर्या कुलकर्णी, मयुरेश मोरे यांचा समावेश आहे, अशी माहिती दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकौंटंट ऑफ इंडिया कोल्हापूर शाखेचे व्यवस्थापक स्वप्निल सादळे यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news