कोल्हापूर : सायकल ट्रॅकवरचा २५ लाखांचा खर्च गेला वाया

कोल्हापूर : सायकल ट्रॅकवरचा २५ लाखांचा खर्च गेला वाया

Published on

कोल्हापूर; डॅनियल काळे : शहरात सायकलपटूंची किंवा आयर्नमॅन होऊ इच्छिणाऱ्यांची संख्या हजारात आहे. या सर्वांना सायकल ट्रॅकची गरज आहे. महापालिकेने गेल्या वर्षी घाईगडबडीत शिवाजी विद्यापीठासमोरील रस्त्यावर १४०० मीटरचा सायकल ट्रॅक केला. राजाराम कॉलेजच्या चौकात प्रवेशाची कमान आणि तेथून पुढे शाहू टोल नाक्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर बाहेर पडणारी कमान करण्यात आली. काही अंतरावर सायकल ट्रॅक दर्शविणारे फलक लावण्यात आले. क्रॉंक्रिट ब्लॉक बसविले आणि काढूनही घाईगडबडीत, कोणतेही नियोजन नसताना केलेल्या या ट्रॅकचे अस्तित्व संपल्याने महापालिकेचा २५ लाखांचा खर्च वाया गेला आहे.

कोल्हापूर ही क्रीडानगरी आहे. शहरात आता आयर्नमॅनची संख्याही मोठी आहे. ५० आयर्नमॅन झाले आहेत. आयर्नमॅन होण्याचे स्वप्न बाळगून तयारी करणारेही शेकडो तरुण आहेत; पण या सर्वांना तयारीसाठी शहरात चांगला सायकल ट्रॅक नाही. याबाबतीत वारंवार मागणी होऊ लागल्याने महापालिकेने गतवर्षी शिवाजी विद्यापीठासमोर एक सायकल ट्रॅक तयार केला; पण घाईगडबडीमुळे या ट्रॅकचे काम चांगले झाले नाही, तसेच हा ट्रॅक पहिल्यापासूनच अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला होता. १४०० मीटरच्या ट्रॅकवर ५० अडथळे पार करूनच सायकलस्वाराला पुढचा प्रवास करावा लागत असल्याने हा ट्रॅक नेमका केला कशासाठी, असा सवाल सायकलस्वारांतून उपस्थित केला जात आहे.

गतवर्षी मार्च महिन्यात हा ट्रॅक बनविला; पण याचा उपयोग सायकलस्वारांना कमी आणि फळ विक्रेत्यांनाच जास्त झाला आहे. या ट्रॅकची काही कामे अपुरी आहेत.

सायकलपटूंसाठी शहरात नव्या ट्रॅकची गरज आहे. खेळाडूंना दहा ते पंधरा किलोमीटर सायकलिंग करावे लागते. त्यामुळे किमान दहा किलोमीटरचा ट्रॅक हवा. असा ट्रॅक शहरात असायला हवा, असे नाही तर तो शहराबाहेरुन जाणाऱ्या रिंगरोडवर असला तरी हरकत नाही. परंतु, सुरक्षितता लक्षात घेऊन प्रशासनाने त्याचे नियोजन करायला हवे.
– चेतन चव्हाण सायकलपटू

कोल्हापूर महापालिकेने या ट्रॅकसाठी
खासगी ठेकेदाराला काम दिले आहे.
या ट्रॅकमधील काही कामे अपूरी आहेत. ती पूर्ण करून घेतली जातील. वाकलेल्या कमानीही सरळ करण्यात येणार आहेत.                                                                    – चेतन अरमल, कनिष्ठ अभियंता, महापालिका

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news