कोल्हापूर : ‘महाराष्ट्र एक्स्प्रेस’चा प्रवास होणार ‘गारेगार’

कोल्हापूर : ‘महाराष्ट्र एक्स्प्रेस’चा प्रवास होणार ‘गारेगार’

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

राज्याची दोन टोके जोडणार्‍या 'महाराष्ट्र एक्स्प्रेस'मधील गारेगार प्रवासाची संधी आणखी प्रवाशांना मिळणार आहे. महाराष्ट्र दिनापासून अर्थात 1 मे पासून या गाडीला तृतीय श्रेणीचे आणखी दोन वातानुकूलित डबे (एसी 3 टायर) कायमस्वरूपी जोडले जाणार आहेत.

राज्यातील सर्वात लांब धावणारी रेल्वे, पश्चिम महाराष्ट्रातील एक टोक ते विदर्भातील शेवटचे टोक जोडणारी रेल्वे अशी कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेसची ओळख आहे. नेहमी या गाडीला प्रवाशांची गर्दी असते. यामुळे अनेकदा या गाडीला 'वेटिंग' असते. वाढत्या गर्दीचा विचार करून मध्य रेल्वेने या गाडीला वातानुकूलित दोन जादा डबे जोडण्याचा निर्णय घेतला आहे.

दि.1 मे पासून कोल्हापूर-गोंदिया या मार्गावर तर दि.3 मे पासून गोंदिया-कोल्हापूर या गाडीला हे दोन जादा डबे जोडले जातील. यानंतर दररोज या गाडीला एसी टू टायरचे एक तर एसी थ्री टायरचे चार असे वातानुकुलित पाच डबे असतील. यामुळे या गाडीला 10 स्लीपर कोच (शयनयान श्रेणी), 5 वातानुकुलित (एसी) व 5 जनरल असे एकूण 20 डबे असतील.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news