कोल्हापूर महापालिका प्रभाग २७ अन् ८१ नगरसेवक

कोल्हापूर : सौरऊर्जेवर स्वच्छ होणार थेट पाईपलाईनचे पाणी
कोल्हापूर : सौरऊर्जेवर स्वच्छ होणार थेट पाईपलाईनचे पाणी
Published on
Updated on

कोल्हापूर महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजला असून, यापूर्वी केलेली एकसदस्यीय प्रभागरचना रद्द करून आता तीनसदस्यीय प्रभागरचना पद्धतीने निवडणूक होणार आहे. निवडणुकीसाठी 27 प्रभाग असतील. लोकसंख्येनुसार पूर्वीप्रमाणेच नगरसेवकांची संख्या 81 राहणार आहे. निवडणुकीसाठी ओबीसी आरक्षण लागू होणार असून, त्याबाबतचा निर्णय आयोग नंतर जाहीर करणार असल्याचे सांगण्यात आले.

5 ऑक्टोबरनंतर प्रारूप प्रभागरचना तयार करून ई-मेलद्वारे कळवावे, असे आदेश राज्य निवडणूक आयोगाने महापालिका प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे आता महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार आहे.

कोल्हापूर शहराची 2011 च्या जनगणनेनुसार 5,49,236 इतकी लोकसंख्या आहे. त्यातील मतदारांची संख्या 4 लाख 69 हजार 964 आहे. परिणामी, एकेका प्रभागात सुमारे 20 ते 21 हजार लोकसंख्या असणार आहे. मतदारांची संख्या एकेका प्रभागात सुमारे 16 ते 17 हजार इतकी असेल. 27 प्रभागांना नंबर किंवा आवश्यक वाटल्यास नावाने ओळखावे, अशा सूचनाही आयोगाने केल्या आहेत. 1 जानेवारी 2022 पर्यंत 18 वर्षे पूर्ण होणार्‍या मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.

राज्य शासनाने महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमांतर्गत महापालिकेमध्ये एकसदस्यीय प्रभाग पद्धतीऐवजी बहुसदस्यीय प्रभाग पद्धती लागू केली आहे. 3 सदस्यांचे प्रभाग करायचे आहेत. सर्व प्रभाग 3 सदस्यांचे करणे शक्य नसेल तेथे एक प्रभाग 2 किंवा 4 सदस्यांचा असेल. महापालिकेची एकूण लोकसंख्या भागिले एकूण सदस्य संख्या गुणिले त्या प्रभागातील सदस्यांची संख्या या सूत्रानुसार प्रभागाची सरासरी लोकसंख्या निश्चित करावी. सरासरी लोकसंख्येच्या 10 टक्के कमी किंवा 10 टक्के जास्त या मर्यादेत प्रभागाची लोकसंख्या ठेवता येईल, असे निकष लावण्यात आले असून, कोल्हापूर महापालिकेची लोकसंख्या व मागील प्रभाग 81 असल्याने तीनसदस्यीय प्रभागरचनेनुसार 27 करण्यात आले आहेत.

महापालिका निवडणुकीसाठी त्रिसदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार नव्याने प्रारूप प्रभागरचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महापालिकेची मागील सार्वत्रिक निवडणुकीनंतर अधिसूचनेनुसार हद्दीत झालेले बदल, (क्षेत्र समाविष्ट करणे किंवा वगळणे), विकासाच्या योजनांमुळे झालेले भौगोलिक बदल उदा., नवीन रस्ते, पूल, इमारती विचारात घेण्यात यावे. प्रभागरचना, आरक्षण व सोडतीच्या कार्यवाहीसाठी लागणारा कालावधी विचारात घेता निवडणुका पार पाडण्यासाठी प्रारूप प्रभागरचनेचा कच्चा आराखडा तयार करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. प्रत्यक्ष प्रभागरचना, आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम स्वतंत्रपणे राज्य निवडणूक आयोगाकडून देण्यात येणार आहे.

ओबीसी आरक्षणाबाबत… ( कोल्हापूर महापालिका )

नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या (ओबीसी) आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात विकास गवळी यांनी महाराष्ट्र शासनाविरुद्ध केलेल्या रिटपिटिशनमध्ये न्यायालयाने 4 मार्च 2021 रोजी दिलेल्या निकालानुसार करावयाची कार्यवाही ही आरक्षणासंदर्भात असल्याने प्रभाग प्रसिद्धी व आरक्षण सोडत कार्यक्रमात त्याबाबतच्या सूचना देण्यात येणार आहेत.

…अशी असेल समिती ( कोल्हापूर महापालिका )

कच्चा आराखडा तयार करण्यासाठी समिती आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती असेल. यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या क्षेत्राची संपूर्ण माहिती असलेला अधिकारी, प्रभागरचनेशी संबंधित अधिकारी, नगररचनाकार, संगणक तज्ज्ञ तसेच आवश्यकतेनुसार इतर अधिकारी यांची समिती नियुक्त करण्यात येणार आहे.

निवडणुकीसाठी प्रारूप प्रभागरचना तयार करण्याच्या सूचना आल्यानंतर बुधवारी उपायुक्त रविकांत आडसूळ यांनी महापालिकेत बैठक घेतली. यात निवडणूक प्रक्रियेबरोबरच 1 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत मतदार जनजागृती अभियान राबविण्याबाबत उपायुक्त आडसूळ यांनी अधिकार्‍यांना सूचना दिल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news