

पन्हाळा : पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर-पन्हाळा रस्त्यावर वाघबीळ घाटात कोल्हापूरहून पन्हाळ्याच्या दिशेने येणार्या कारने एका दुचाकीस्वाराला उडवून अन्य वाहनांना धडक दिली. याप्रकरणी वाहन चालक जयदीप ऊर्फ पवनकुमार दीपक शेटे (वय 42, रा. कबनूर, इचलकरंजी) याला मद्यधुंद अवस्थेत अतिवेगाने वाहन चालविल्याप्रकरणी ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणाला सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
शेटे हा एमएच 09 ईएल 0466 या वाहनाने पन्हाळ्याच्या दिशेने जात होता. वाघबीळ घाटात त्याने एका दुचाकीस्वारास उडवून घाटात इतर वाहनांनाही धडक दिली. पुढे पन्हाळा येथील नाक्यावरही न थांबता तो पुढे गेला. काही तरुणांनी त्याचा पाठलाग करत पन्हाळा गाठला. त्यांच्यासह स्थानिक तरुण व पन्हाळा पोलिसांनी त्याला तीन दरवाजा परिसरात पकडले. दरम्यान नलवडे बंगला परिसरातील ही घटना पाहून एका वाहन चालकाने पन्हाळा पोलिसांना माहिती दिली.