कोल्हापूर : बाबुजमाल परिसरात कारवर भिंत कोसळली

कोल्हापूर : बाबुजमाल परिसरात कारवर भिंत कोसळली
Published on
Updated on

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : शहरातील बाबुजमाल परिसरात धोकादायक इमारतीची भिंत कारवर कोसळली. यात कारचे मोठे नुकसान झाले. इमारत मालकांनी महापालिकेला कळविल्यानंतर कर्मचार्‍यांनी धोकादायक इमारतीचा भाग उतरविला.

महापालिकेच्या वतीने बाबुजमाल येथील सि.स.नं. 3216-1/2 प्रकाश सदाशिव भालेकर व इतर 11 जणांच्या संयुक्‍त इमारतीचा धोकादायक भाग सोमवारी उतरविण्यात आला. इमारतीचा काही भाग सकाळी पडल्याने संबंधित मालकाने धोकादायक इमारतीचा भाग उतरविण्याबाबत महापालिकेकडे लेखी अर्ज दिला होता. त्याप्रमाणे रहदारीचा व वाहतुकीचा रस्ता असल्याने तातडीने धोकादायक भाग उतरवून घेतला.

शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय कार्यालय क्रं.2 च्या वतीने ही कारवाई करण्यात आली. सदरची कारवाई 1 जेसीबी, अग्‍निशमन वाहन व 25 कर्मचार्‍यांच्या सहाय्याने करण्यात आली. यावेळी कनिष्ठ अभियंता निवास पोवार, उपमुख्य अग्‍निशमन अधिकारी तानाजी कवाळे व कर्मचारी उपस्थित होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news