कोल्हापूर : प्रत्येक क्षेत्र नॅनो टेक्नॉलॉजीच्या कवेत : प्रा. डॉ. जाधव

कोल्हापूर : प्रत्येक क्षेत्र नॅनो टेक्नॉलॉजीच्या कवेत : प्रा. डॉ. जाधव
Published on
Updated on

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : नॅनो टेक्नॉलॉजीचे अगणित उपयोग आजही होत आहेत व यापुढेही होत राहतील. नॅनो टेक्नॉलॉजी (अतिसूक्ष्मतंत्रज्ञान) च्या उपयोगाची यादी खूप मोठी आहे. जीवशास्त्र, जैविकशास्त्र, पर्यावरणशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स, बांधकाम, सौंदर्य प्रसाधने आणि इतर अनेक क्षेत्रांमध्ये करिअरच्या द़ृष्टीने फार मोठ्या संधी नॅनो टेक्नॉलॉजी व नॅनो सायन्समध्ये उपलब्ध आहेत. आजघडीला प्रत्येक क्षेत्र नॅनो टेक्नॉलॉजीच्या कवेत असून हे तंत्रज्ञान रोज नवनवीन क्षेत्रांत क्रांतिकारक बदल घडवत राहील, असे प्रतिपादन प्रा. डॉ सुशीलकुमार जाधव यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दै. 'पुढारी'चे सहायक सरव्यवस्थापक राजेंद्र मांडवकर होते.

दै. 'पुढारी' आयोजित एज्युदिशा प्रदर्शनात नॅनो टेक्नॉलॉली – संशोधनाची कवाडे उघडणारे शास्त्र या विषयावर विद्यार्थ्याना मार्गदर्शन करताना जाधव म्हणाले, अनेकविध क्षेत्रांमध्ये नॅनो टेक्नॉलॉजी विषय घेऊन बॅचलर्स किंवा मास्टर्स अधिक पीएचडी केलेल्या विद्यार्थांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये खूप मागणी आहे. संरक्षण खाते, ऊर्जा बचत, सोलार सेल यामध्येही नॅनो तंत्रज्ञान वापरले जात असून आजच्या घडीला पोस्ट कार्डाच्या आकाराचा हार्ड ड्राईव्ह आहे. परंतु नॅनोच्या मदतीने त्यापेक्षा कित्येक पटीने लहान ड्राईव्ह लवकरच तयार होणार आहे. थोड्या जागेत अमर्याद माहितीचा साठा करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स इंडस्ट्रीत अनेक यशस्वी संशोधनांची मालिका सुरू असल्याचेही जाधव यांनी सांगितले.

मानवाच्या जीवनात आमूलाग्र बदल करणारा घटक म्हणजे नॅनो टेक्नॉलॉजी. जगातल्या प्रत्येक घटकाला नॅनो टेक्नॉलॉजीचा स्पर्श होतो आहे. नॅनो याचा अर्थ मीटरचा एक अब्जांश भाग एखाद्या पदार्थाच्या अणु-परमाणूंच्या मांडणीचा विचार करून आपल्याला हव्या त्या गुणधर्माचे पदार्थ बनवण्याची क्षमता नॅनो टेक्नॉलॉजीचं तंत्रज्ञान देऊ शकते. नॅनो गारमेंट या कपड्यांवर धूळ कमी बसते. इतकेच नाही तर नॅनो मेडिसिन, नॅनो रोबोटस् यांच्या सहाय्याने वैद्यकीय शास्त्रात आमूलाग्र बदल होत आहे आणि त्याचे द़ृश्य स्वरूप लवकरच पाहायला मिळेल, असेही जाधव म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news