कोल्हापूर : ‘पुढारी’कार डॉ. ग. गो. जाधव यांना अभिवादन

कोल्हापूर : ‘पुढारी’कार डॉ. ग. गो. जाधव यांना अभिवादन

Published on

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : दै. 'पुढारी'चे संस्थापक संपादक पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव यांच्या स्मृतिदिनानिमित्त विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी शनिवारी त्यांना अभिवादन केले. 'पुढारी' भवन येथील डॉ. ग. गो. जाधव यांच्या पुतळ्यास विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह राजकीय, सहकार, सामाजिक, शिक्षण, कला, क्रीडा, सांस्कृतिक आदी क्षेत्रांतील मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

खा. संजय मंडलिक, खा. धैर्यशील माने, खा. धनंजय महाडिक, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आ. हसन मुश्रीफ, आ. सतेज पाटील, आ. पी. एन. पाटील, आ. राजेश पाटील, आ. जयंत आसगावकर, आ. ऋतुराज पाटील, माजी आ. के. पी. पाटील, देवल क्लबचे अध्यक्ष उद्योगपती व्ही. बी. पाटील, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, जिल्हा पोलिसप्रमुख शैलेश बलकवडे, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रशांत देसाई, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. गिरीश कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, जि.प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव, अपर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, करवीरचे प्रभारी प्रांताधिकारी विवेक काळे, पोलिस उपअधीक्षक प्रिया पाटील, तहसीलदार स्वप्निल पवार, उपायुक्त रविकांत आडसूळ, जलअभियंता नेत्रदीप सरनोबत, मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ. विजय पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ. चंद्रशेखर साखरे, माहिती अधिकारी वृषाली पाटील आदींनी आदरांजली वाहिली.

शिवसेना ठाकरे गट जिल्हाप्रमुख संजय पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आर. के. पोवार, राष्ट्रीय काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, संपतराव चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत, माजी महापौर बाजीराव चव्हाण, माजी नगरसेविका मेहजबीन सुभेदार, माजी नगरसेवक मधुकर रामाणे, ईश्वर परमार, विजय पटकारे, दुर्वास कदम, श्रीकांत बनछोडे, सागर यवलुजे, मोहन सालपे, संजय लाड, कॉमन मॅन संघटनेचे बाबा इंदुलकर, प्रजासत्ताक संघटनेचे दिलीप देसाई, विश्वास पोवार, बंटी सावंत, डॉ. प्रमोद बुलबुले, महंमद शरीफ शेख, अन्वर शेख, यशवंत थोरवत, कपिल सकटे, अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, मल्हार सेनेचे बबनराव रानगे, प्रकाश पाटील, रघू हजारे, अवधूत पाटील, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष संजय पाटील, धनंजय दुग्गे, अजित कोठारी, संपत पाटील, राहुल नष्टे, प्रशांत शिंदे, जिल्हा बार असोसिएशनचे उपाध्यक्ष विजय पाटील, संचालक अ‍ॅड. तेजगोंडा पाटील, जसमिन आडनाईक, नवतेश देसाई, विनायक म्हांगोरे, सौरभ सरनाईक, अश्विनी भोसले, अनिशा शेख, ओंकार पाटील, कुणाल नलवडे, बेनझीर जमादार, विशाल धनवडे, लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे, पोलिस निरीक्षक तानाजी सावंत, शिवसेना ठाकरे गटाचे प्रवीण पालव, अभिजित बुकशेठ, अनंत पोतदार आदींनीही अभिवादन केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news