कोल्हापूर : पीओपी मूर्तींची 70 टक्के कामे पूर्ण

कोल्हापूर : पीओपी मूर्तींची 70 टक्के कामे पूर्ण
Published on
Updated on

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

कोरोनामुळे गेली दोन वर्षे सण-उत्सवांवर असणारे कडक निर्बंध कमी करण्याबरोबर यंदा अपवादात्मक परिस्थितीत 'पीओपी'च्या गणेशमूर्तींना परवानगी देण्यात आली आहे. मूर्तीच्या उंचीवर मर्यादा नसून 'प्लास्टर ऑफ पॅरिस' असे ठळकपणे नमूद करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मुंबई येथे प्रशासन, गणेशमंडळे व मूतिर्र्कार यांच्या संयुक्‍त बैठकीत हे निर्णय घेण्यात आले असून राज्यभर याची अंमलबाजवणी होणार आहे.

कोरोनाची चौथी लाट ओसरत असून या पार्श्‍वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव कसा साजरा होणार? याबाबत उत्सुकता होती. पीओपीच्या गणेश मूर्तींवरील बंदी कायम ठेवण्यात आली होती. मात्र गणेश मंडळांसह मूर्तीकारांनी घेतलेल्या अक्षेपामुळे यंदा अपवादात्मक परिस्थितीत गणेशमूर्तींना परवानगी देण्यात आली आहे. मूर्तीच्या उंचीवर मर्यादा नसून 'प्लास्टर ऑफ पॅरिस' असे ठळकपणे नमूद करणे बंधनकारक करण्यात आले आहे. दरम्यान, पीओपीच्या गणेशमूर्तींचे 70 टक्के काम पूर्ण झाल्याचे चित्र आहे.

मुंबई महानगरपालिका प्रशासन, गणेशोत्सव समिती, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे प्रतिनिधी, मूर्तिकारांच्या संघटनांचे प्रतिनिधी यांच्या बैठकीत याबाबतचे निर्णय झाल्याने. मुंबई पाठोपाठ संपूर्ण राज्यात यांची अंमलबजावणी होणार आहे. याच बरोबर गेल्या दोन वर्षांपासून सण-उत्सवांवर असणारे निर्बंधही कमी करण्याबाबत विचारविनिमय सुरू आहे.

न्यायाच्याच्या पीओपी बंदीच्या कारवाईबाबत प्रशासनाकडून अंमलबजावणी व उपाय योजना होत नसल्याचे वास्तव आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसला पर्याय म्हणून शाडू मातीची उपलब्धता करून देणे आवश्यक आहे. मात्र ती होत नसल्याचे कुंभार व्यावसायिक व मूर्तिकारांना पीओपी शिवाय पर्याय नसल्याचे चित्र आहे.

'पीओपी' मूर्तींनाच अधिक पसंती

कोल्हापुरातील गणेशमूर्तींना पश्‍चिम महाराष्ट्र, कोकण, कर्नाटक, गोवा, आंध— या परराज्यातून मोठी मागणी असते. बहूतांशी गणेश मंडळांसह व घरगुती मूर्ती 'पीओपी'च्याच बनवाव्यात अशी मागणी मूर्तींकारांकडे भाविकांकडून केली जाते. शिवाय पीओपीच्या मूर्तीं विसर्जनासाठी कृत्रिम कुंड, काहिली व खणीची कोल्हापुरात स्वतंत्र व्यवस्था आहे. यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून कुंभार व्यावसायिकांकडून बहुतांशी गणेशमूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिसपासूनच निर्माण केल्या आहेत.

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींना आधिपासूनच ऑर्डर देण्यात आल्या आहेत. यामुळे पीओपीच्या गणेश मूर्तींची 70 टक्के कामे पूर्ण झाली आहेत. मूर्तींचे कास्टिंग झाले असून फिनिशिंग व कलरची कामे सुरू करण्यात आली आहेत.
– उदय कुंभार, मूर्तिकार व्यावसायिक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news