

कोल्हापूर : दै. 'पुढारी' पुणे प्रॉपर्टी एक्स्पो 2022 च्या दिमाखदार उद्घाटनासाठी कोल्हापूर नगरी आता सज्ज झाली आहे. शनिवारपासून (दि.26) सलग दोन दिवस सुरू होणार्या या प्रॉपर्टी एक्स्पोमध्ये कोल्हापुरात राहून पुण्यातील घर खरेदीच्या संधीचे नानाविविध पर्याय खरेदीदारांना खुले होणार आहेत.
कोल्हापुरातील हॉटेल पॅव्हेलियन येथील मधुसूदन हॉल येथे हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. 'आयकॉन स्टील' हे या प्रॉपर्टी एक्स्पोचे प्रमुख प्रायोजक आहेत. पुण्यासारख्या शहरात घर खरेदीचा अनुभव प्रत्येकासाठी खास असतो. कारण गुणवत्तापूर्वक आणि आश्वासक घर बांधणी ही इथल्या विकसकांची जमेची बाजू आहे. बजेट होम्सपासून ते लक्झुरी होम्स, सेकंड होम्स आणि रो हाऊसेसमध्ये घर उभारणीसाठी विविध विकसक अनेक शक्कल लढवत असतात.
ग्रीन बिल्डिंग या संकल्पनेमुळे त्यात आता आणखीनच भर पडली आहे. त्यामुळे पुण्यात घर खरेदीसाठी उत्सुक असणार्या कोल्हापूरमधील घर खरेदीदारांनाही या महत्त्वाकांक्षी गृहप्रकल्पाच्या भव्य प्रदर्शनात सहभागी होता येणार आहे. या प्रदर्शनात सहभागी झालेल्या विकसकांकडून ग्राहकांना अनेक सवलतीही दिल्या जाणार आहेत.
दै. 'पुढारी' पुणे प्रॉपर्टी एक्स्पो 2022 मध्ये एकाच छताखाली घर खरेदीचे हजारो पर्याय उपलब्ध करण्यात आले आहेत. या प्रदर्शनात ग्राहकांना तत्काळ बुकिंग करण्याचीही सुविधा देण्यात आली आहे. पुण्यातील विविध नामांकित विकसकांनी यात सहभाग नोंदवला आहे. दै. 'पुढारी' पुणे प्रॉपर्टी एक्स्पो 2022 मध्ये लोकांच्या गरजेनुसार आणि बजेटनुसार प्रॉपर्टीचे विकल्प उपलब्ध आहेत. याशिवाय घर खरेदीची प्रक्रिया तत्काळ पूर्ण करण्यासाठीही बँकांचे प्रतिनिधीही या प्रदर्शनात सहभागी होणार आहेत. ज्यामुळे दस्तावेज, कर्जसुविधा यांची तत्काळ माहितीही ग्राहकांना मिळू शकणार आहे.
स्थळ : मधुसूदन हॉल, हॉटेल पॅव्हेलियन, बसंत-बहार रोड, न्यू शाहूपुरी.
वेळ : सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत.
अधिक माहितीसाठी संपर्क : 9822309352