कोल्हापूर : दोनवडे येथील शाळकरी मुलीच्या मृत्यूने मनाला चटका!

कोल्हापूर : दोनवडे येथील शाळकरी मुलीच्या मृत्यूने मनाला चटका!

Published on

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : ठेच लागून पडल्यानंतर डोक्याला खुरपे लागून जखमी झालेल्या दोनवडे (ता.भुदरगड) येथील शर्वरी सुरेश पाटील ( वय 12) या शाळकरी मुलीचा मृत्यू झाला. शासकीय रुग्णालयात बालिका तीन दिवसांपासून मृत्यूशी झुंज देत होती. मनाला चटका लावणार्‍या या घटनेमुळे दोनवडेसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सध्या शेतीच्या कामाची धांदल उडाली असल्याने आई, वडिलांसमवेत शर्वरीही मंगळवारी सकाळी शेतात गेली होती. काम आटोपल्यानंतर शेतातून घराकडे परतत असताना अनपेक्षित ठेच लागली आणि बालिका जमिनीवर कोसळली. हातातील खुरप्याच्या धारदार टोकामुळे तिच्या डोक्याला गंभीर इजा झाली. रक्तस्त्राव सुरू झाला. आई, वडिलांसह कुटुंबीयांनी जखमेच्या ठिकाणी पट्टी बांधली. स्थानिक डॉक्टरांकडे उपचार केले. रक्तस्त्राव थांबत नव्हता. त्यात बालिका बेशुद्ध झाली.

मामा दिग्विजय सूर्यवंशी यांच्यासह नातेवाईकांनी शर्वरीला तत्काळ शासकीय रुग्णालयात हलविले. अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. शनिवारी सकाळी प्रकृतीत सुधारणा झाली. मात्र, सायंकाळनंतर पुन्हा प्रकृती चिंताजनक बनली. डॉक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतरही चिमुरडीने मान टाकली.

मुलीच्या दुर्दैवी मृत्यूची बातमी समजताच आई-वडिलांसह नातेवाईकांनी हंबरडा फोडला. मनाला चटका लावणार्‍या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news