कोल्हापूर : दोन नगरपालिकांत दहा जागा ओबीसींसाठी

कोल्हापूर : दोन नगरपालिकांत दहा जागा ओबीसींसाठी
Published on
Updated on

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील पन्हाळा आणि मलकापूर नगरपालिकांच्या प्रभागांची आरक्षण सोडत गुरुवारी काढण्यात येणार आहे. या दोन्ही नगरपालिकांत प्रत्येकी पाच याप्रमाणे दहा जागा इतर मागास प्रवर्गासाठी आरक्षित राहणार आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील पन्हाळा आणि मलकापूर या दोनच नगरपालिकांच्या प्रभागाची आरक्षण सोडत काढली जाणार आहे. उर्वरित सहा नगरपालिकांचा ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता, तो आयोगाने रद्दही केला आहे. मात्र, या नगरपालिकांच्या सुधारित आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आयोगाने जाहीर केलेला नाही.

पन्हाळा नगरपालिकेच्या 20 जागांपैकी 3 जागा अनुसूचित जाती प्रवर्गासाठी, तर 5 जागा इतर मागास प्रवर्गासाठी राखीव होतील. यातील 50 टक्के जागा महिलांसाठी असतील. मलकापूर नगरपालिकेतील एकूण 20 जागांपैकी 4 जागा अनुसूचित जाती प्रवर्गासाठी, तर 5 जागा इतर मागास प्रवर्गासाठी राखीव राहतील, अशी शक्यता आहे.

या जागांपैकी 50 टक्के जागा त्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. दोन्ही ठिकाणी आरक्षणानंतर उर्वरित खुल्या प्रवर्गासाठी शिल्‍लक जागांपैकी 50 टक्के जागा महिलांसाठी राखीव होतील.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news