दानोळी (कोल्हापूर); पुढारी वृत्तसेवा : वारणा नदीकाठी तरुणावर मगरीचा हल्ला : येथील वारणा काठावर पोहायला गेलेल्या तरुणावर मगरीने हल्ला केला. पोहून काठावर आल्यानंतर हल्ला झाल्याने तरुणाला जमीनीचा आधार मिळाल्याने आणि सोबत असणाऱ्या तरुणांनी आरडा-ओरडा केल्याने मगर नदीत पसार झाली. तरुणाच्या पायला जखम झाली असून त्याच्यावर सांगली शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कयुम अमीरहंमजा नदाफ (वय २८) हा तरुण मित्रांसोबत वारणा नदी काठावर पोहण्यासाठी गेला होता. नदीत पोहुन काठावर येताच त्याच्या पायाला मगरीने आपल्या दातात धरले.
पण तो काठावर असल्याने त्याला जमिनीचा आधार लागला. आणि सोबत असलेल्या मित्रांनी आरडा ओरडा केल्याने मगरीने त्याचा पाय सोडून नदीत पसार झाली. आणि कयूमचे प्राण वाचले पण त्याच्या उजव्या पायाच्या घोटा आणि पिंडरीत मगरीचे दात घुसल्याने जखम झाली आहे.
दरम्यान, घटनास्थळाला वनविभाग आणि ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी भेट देऊन सावधगिरी बाळगावी असे, अहवान केले आहे.