कोल्हापूर : उचगाव यादववाडी विद्यामंदिर; जगाशी जोडलेली शाळा

कोल्हापूर : उचगाव यादववाडी विद्यामंदिर; जगाशी जोडलेली शाळा
Published on
Updated on

कोल्हापूर; डॅनियल काळे :  जिल्हा परिषदेच्या विद्यामंदिर यादववाडी (उचगाव) या शाळेत 'स्मार्ट टू ग्लोबल क्लासरूम' हा नावीन्यपूर्ण प्रकल्प पूर्ण झाला आहे. यासाठी ३३ लाखांची तरतूद केली होती. यामुळे गोरगरिबांच्या मुलांनाही आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळत आहे. मातृभाषेतून राबवलेले विविध उपक्रम व इंग्रजी भाषेतील उत्तम तयारी, अद्ययावत तंत्रज्ञानामुळे येथील विद्यार्थी देश विदेशातील शिक्षकांशी, शिक्षणतज्ज्ञांशी इंग्रजी भाषेत संवाद साधत आहेत. यादववाडी विद्यामंदिर या माध्यमातून जगाशी जोडली आहे.

या उपक्रमाअंतर्गत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या देश- विदेशातील विविध मान्यवरांना विद्यार्थ्यांच्या भेटीला आभासी स्वरूपात आणून विद्यार्थ्यांचे संवाद, प्रश्न निर्मिती, सभाधीटपणा या कौशल्याचा विकास केला जातो.

बियोंड बॉर्डर

इंग्रजी भाषेची भीती दूर व्हावी, इतर देशातील संस्कृती त्या देशाची वैशिष्ट्ये,तेथील उपक्रम अशा बाबींची माहिती मिळावी या उद्देशाने विद्यार्थ्यांनी आत्तापर्यंत तैवान, व्हिएतनाम, अमेरिका, रोमानिया अशा विविध देशांतील शिक्षकांशी व आत्मविश्वासाने संवाद साधला आहे.

पर्यावरणस्नेही दिवाळी

या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी दिवाळीच्या सणाला फटाके न वाजवता पर्यावरणस्नेही दिवाळी साजरी करत वर्गातील ग्रंथालयासाठी पुस्तके भेट दिली आहेत. यातून ५०० पुस्तकांच्या ग्रंथालयाची निर्मिती झाली आहे.

लेटस् स्पीक

इंग्रजी भाषेच्या उत्तम तयारीसाठी पहिली पासूनच तयारी करून घेण्यात आली. त्यामुळे वर्गामध्ये इंग्रजी भाषा बोलण्यासाठी सदृढ वातावरण निर्मिती झाली. साहजिकच चौथीमध्ये विद्यार्थी सहजपणे इंग्रजी बोलू लागले.

ऑनलाईन विकली टेस्ट

तंत्रज्ञानाच्या मदतीने शिकवलेल्या घटकांची १०० गुणांची टेस्ट दर आठवड्याला घेतल्यामुळे तात्काळ ऑनलाईन मूल्यमापन होते. या उपक्रमास मुख्याध्यापक ए. के. पाटील, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ. संजना बनसोडे व सर्व सदस्य, शाळेतील शिक्षक वृंद, ग्रामस्थ, वरिष्ठ अधिकारी व प्रशासन यांचे सहकार्य मिळत आहे.

विविध स्पर्धा परीक्षांची तयारी

विद्यार्थ्यांना यासारख्या स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण व्हावी यासाठीही शिष्यवृत्ती, नवोदय गणित प्रावीण्य परीक्षा, मंथन प्रज्ञाशोध परीक्षा, केटीएस इत्यादी शासनमान्य परीक्षांची तयारी शाळेच्या वेळेव्यतिरिक्त करून घेतली जाते. यामध्ये विद्यार्थ्यांनी जिल्हास्तर व राज्यस्तरीय यश संपादन केलेले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news