कोल्हापूर : गोकुळ शिरगावात जुगार अड्ड्यावर छापा

कोल्हापूर : गोकुळ शिरगावात जुगार अड्ड्यावर छापा
Published on
Updated on

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : गोकुळ शिरगाव (ता. करवीर) परिसरात गोकुळ कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळामार्फत चालविल्या जाणार्‍या तीन पानी जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषणने छापा टाकून अड्डामालक विजय सतीश घळके, जागा मालक अर्जुन महादेव मिठारी यांच्यासह 24 जणांविरुद्ध गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. संशयितांना रात्री उशिरा अटक करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये 2 लाख 8 हजार 770 रुपये, 22 मोबाईल, तीन मोटारसायकलींसह 4 लाख 38 हजार 570 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक संजय गोर्ले यांनी सांगितले.

संशयित गणेश नागेश पाटील (रा. दौलतनगर), अभिनंदन आनंदा पाटील (रा. गोकुळ शिरगाव), शिवाजी गणपती शिरगावे (रा. कंदलगाव, ता. करवीर), शिवाजी रामचंद्र पाटील (रा. सावर्डे, ता. कागल), नागेश शामराव शेळके (रा. कणेरीवाडी), आनंदा विलास आरते (48, रा. वडणगे, ता. करवीर), संभाजी शंकर निर्मळे (रा. कंदलगाव), संजय वसंत वाकळे (50, रा. नेर्ली, ता. करवीर), संजय सदाशिव पाडळीकर (54, रा. उचगाव, ता. करवीर), चंद्रकांत विश्वनाथ गडहिरे (52, रा. राजेंद्रनगर), अविनाश ज्ञानोबा घोळवे (37, रा. कागल), विकास आनंदराव सूर्यवंशी (46, रा. शिवाजी पेठ, कोल्हापूर), प्रताप हिंदुराव नागराळे (45, रा. कोगनोळी), दादासाहेब अंबादास माने (51, रा. उचगाव), कैलास महादेव खिल्लारे (37, रा. कराड), दत्तात्रय गजानन काटकर (38, रा. पोर्ले, ता. पन्हाळा), जिगनू सरवर बांटुगे (37, रा. मोरेवाडी, ता. करवीर), अल्लाउद्दीन रसूल नायकवडी (66, रा. शिरोली पुलाची), रवींद्र चव्हाण (36, रा. राजारामपुरी), नितीन बाबुराव मर्दाने (47, रा. कागल), संतोष बाजीराव वारके (रा. कणेरीवाडी), मुकेश नवलकिशोर सिंग (41, रा. कणेरी, ता. करवीर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. अड्ड्याचा मालक विजय सतीश घळके व जागा मालक अर्जुन महादेव मिठारी याच्यावरहीगुन्हा दाखल केल्याचे संजय गोर्ले यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news