

गडहिंग्लज; पुढारी वृत्तसेवा : येथे डाबर मिस्वाक, दै. पुढारी कस्तुरी क्लब आणि लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लि. (मल्टिस्टेट) यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (दि. 24) 'खेळ पैठणीचा' कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी चार वाजता बॅ. नाथ पै विद्यालयाच्या मैदानावर 'होम मिनिस्टर'चा किताब कोण जिंकेल, हे समजणार आहे. अभिनेते व दिग्दर्शक प्रा. शिवाजी पाटील हे 'होम मिनिस्टर'चा खेळ घेणार आहेत. अधिकाधिक महिलांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
'कस्तुरी 100 नंबरी खेळ पैठणीचा' हा कार्यक्रम घेण्यात येणार असून, प्रथम विजेतीला मानाची पैठणी मिळणार असून, दहा विजेत्यांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत. याशिवाय या ठिकाणी हळदी-कुंकू कार्यक्रमात सहभागी होणार्या प्रत्येक महिलेला संक्रांतीचे वाण दिले जाणार आहे. अधिक माहितीसाठी 9423539561, 8805023624 या क्रमांकांवर संपर्क साधावा.
गडहिंग्लजच्या कार्यक्रमानंतर उद्या (बुधवार, दि.25) आजरा येथे दै. पुढारी कस्तुरी क्लब व लोकमान्य मल्टिपर्पज को. सोसायटी लि. यांच्या संयुक्त विद्यमाने 'खेळ पैठणी'चा कार्यक्रम होणार आहे. दुपारी 12 वाजता गंगामाई वाचन मंदिरात सर्व महिलांसाठी हळदी-कुंकू व 'खेळ पैठणीचा होम मिनिस्टर' ही स्पर्धा होणार आहे.
लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लि. (मल्टिस्टेट) संस्थेच्या आजरा शाखेने अवघ्या दशकभरात मोठी भरारी घेतली आहे. सन 2011 मध्ये आजरा येथे मेन रोडवरील बुरूड बिल्डिंग ही शाखा कार्यरत झाली आहे. आजवर या शाखेने 18 कोटी ठेवींचा टप्पा पूर्ण करून आजरेकरांचा विश्वास संपादन केला आहे.