कोल्हापूर : कुरुंदवाड पाणी योजनेचा प्रश्न लवकरच मार्गी : खा. धैर्यशील माने

कोल्हापूर : कुरुंदवाड पाणी योजनेचा प्रश्न लवकरच मार्गी : खा. धैर्यशील माने

कुरुंदवाड; पुढारी वृत्तसेवा :  कुरुंदवाड शहराच्या प्रलंबित नळपाणी पुरवठा योजनेबाबत जुन्या ठेकेदाराला जिल्हाधिकार्‍यांच्या समोर बोलवून आ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना सोबत घेऊन लवकरच बैठक घेऊन योजना कार्यान्वित करणार आहे. योजनेसाठी लागणारा वाढीव दहा कोटी रुपयाचा निधीही देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची घोषणा खा. धैर्यशील माने यांनी केली.दरम्यान कुरुंदवाड शहरातील चतुर्थ वार्षिक कर आकारणी संदर्भात नगर विकास मंत्री, अधिकार्‍यांसोबत शिष्ट मंडळाची बैठक घेऊन याबाबत चर्चा करून योग्य तो मार्ग काढू, असे खा. माने यांनी सांगितले.

कुरुंदवाड पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आढावा बैठक बोलाविण्यात आली होती यावेळी तेबोलत होते. मुख्याधिकारी तथा प्रशासक आशिष चौहान, माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे, विजय पाटील, जवाहर पाटील उपस्थित होते.
पंचगंगा प्रदूषण प्रश्नावरून व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अभय पटुकले यांनी राधानगरी धरणातून पाणी सोडून नदी प्रवाहित करावी, अशी मागणी मागणी केली असता खा. माने यांनी तत्काळ जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता नदी प्रवाहित करणार आहे. दोन दिवसांत हा प्रश्न मार्गी लागेल असे सांगितले.

प्रशासक तथा मुख्याधिकारी चौहान यांनी शहरातील सी. सी. टीव्ही, भाजीपाला शॉपिंग सेंटर, सांस्कृतिक हॉल उभारणे, भैरववाडी ते शिवतीर्थपर्यंत अनवडी बायपास रस्ता यासह शहरातील विविध विकासकामाच्या 40 कोटी रुपयांचा प्रारूप विकास आराखडा सादर केला. याबत प्रस्ताव तयार करा निधी देण्यासाठी पाठपुरावा करण्याचे खासदार माने यांनी आश्वासन दिले. कुरुंदवाड शहरात नाना-नानी पार्क व उद्यानात लहान मुलांना व वृद्धांना व्यायाम करण्यासाठी बसविण्यात आलेल्या साहित्याची माहिती देण्यात आली. छत्रपती संभाजी महाराज उद्यानातही आणखीन साहित्य देण्याची घोषणा त्यांनी केली.

यावेळी माजी नगरसेवक अक्षय आलासे, दीपक गायकवाड, उदय डांगे, प्रफुल्ल पाटील, रविकिरण गायकवाड, सचिन मोहिते आदींनी शहरातील समस्यांची माहिती दिली. यावेळी चंद्रकांत मोरे, कृष्णा नरके, अली पठाण, रामभाऊ मोहिते, नायकू दळवी, बाळासाहेब ठोंबरे, विलास पाटील, जितेंद्र साळुंखे, प्रवीण खबाले आदी उपस्थित होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news