कोल्हापूर : कुंभी कासारीचा आज निकाल

कोल्हापूर : कुंभी कासारीचा आज निकाल

कोपार्डे : कुंभी कासारी सहकारी साखर कारखाना कुडित्रेच्या पंचवार्षिक निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी (दि. 14) होणार आहे. 23 जागांसाठी 50 उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीत कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष चंद्रदीप नरके विरुद्ध आ. पी. एन. पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

रविवारी अत्यंत चुरशीने 82.45 टक्के मतदान झाले. मंगळवारी सरकारी धान्य गोडावून, रमणमळा येथे मतमोजणी होणार आहे. 35 टेबलवर तीन फेर्‍यांत सकाळी 8 वा. मतमोजणी सुरू होईल, असे निवडणूक अधिकारी वैभव नावडकर व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी प्रदीप मालगावे यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news