कोल्हापूर : करवीर तहसील कार्यालय स्थलांतर; रेकॉर्ड विभाग दहा दिवस बंद

कोल्हापूर : करवीर तहसील कार्यालय स्थलांतर; रेकॉर्ड विभाग दहा दिवस बंद

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  करवीर तहसील कार्यालयाच्या नूतन इमारतीचे बांधकाम लवकरच सुरू होणार आहे. याकरिता तहसील कार्यालय बी.टी.कॉलेजच्या इमारतीत स्थलांतरित करण्यात येणार आहे. त्याला गुरुवारपासून प्रारंभ झाला. रेकॉर्ड विभागाचे सर्व साहित्य स्थलांतरित करण्याचे काम सुरू झाल्याने रेकॉर्ड विभागाचे काम दहा दिवस बंदच राहणार आहे. यामुळे दहा दिवस कोणत्याही नकला मिळणार नाहीत.

भाऊसिंगजी रोडवरील करवीर तहसील कार्यालयासाठी नवी इमारत उभारली जाणार आहे. याकरिता तहसील कार्यालय स्थलांतरित केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात रेकॉर्ड विभागातील सर्व कागदपत्रे स्थलांतरित करण्याचे काम सुरू झालेे. यामुळे तहसील कार्यालयातील रेकॉर्ड विभागाचे काम बंद करण्यात आले आहे. स्थलांतरीत जागेत रेकॉर्ड रूम सुसज्ज झाल्यानंतरच नकला देण्याचे काम सुरू होईल, याकरीता किमान दहा दिवसांचा कालावधी जाईल, असे तहसील कार्यालयातून सांगण्यात आले.

दरम्यान संपूर्ण तहसील कार्यालय या महिन्याअखेरपर्यंत स्थलांतरित होईल, अशी शक्यता आहे. यानंतर सध्याची इमारत पाडून त्या जागी नवी इमारत साकारली जाणार आहे. याकरिता अडीच ते तीन वर्षांचा कालावधी अपेक्षित आहे. तोपर्यंत तहसील कार्यालयाचे कामकाज बी. टी. कॉलेज येथून होणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news