कोल्हापूर : आपत्ती व्यवस्थापनासाठी अ‍ॅक्शन प्लॅन

अ‍ॅक्शन प्लॅन
अ‍ॅक्शन प्लॅन

कोल्हापूर : सतीश सरीकर
शहरात 2019 व 2021 मध्ये महापुराने हाहाकार उडविला होता. नैसर्गिक आपत्तीपुढे महापालिका आणि जिल्हा प्रशासनही हतबल झाले होते. गेल्या दोन महापुरांचा अनुभव घेऊन महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी संभाव्य पूरस्थितीविषयी नियोजन सुरू केले आहे. महापालिकेतील विविध विभागांच्या जबाबदार्‍या निश्चित करण्यात आल्या आहेत. अग्‍निशमन दल, सार्वजनिक आरोग्य
विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य विभाग, विद्युत विभाग, प्राथमिक शिक्षण मंडळ/ कार्यशाळा, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान/परिवहन/ जनसंपर्क कार्यालय यांचा त्यात समावेश आहे.

पूरग्रस्त भागात पाहणी

नागरी वस्तीत पाणी घुसले, तर अग्‍निशमन दलाचे जवान 24 तास तैनात ठेण्यात आले आहेत. रात्रभर या जवानांची पूरग्रस्त भागात पाहणी सुरू आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढण्यापूर्वी नागरिकांना सूचना देण्यात येत आहेत. नागरिकांना स्थलांतरित करावयाची ठिकाणे निश्चित करून वीज, पाणी आदी सुविधा केल्या आहेत. अन्‍न व पाण्याची टंचाई भासू नये यासाठी नियोजन केले आहे. पूरग्रस्त भागातील नागरिकांची वाहने पार्किंग करण्याच्या जागाही निश्चित केल्या आहेत.

समिती स्थापन
कोल्हापूर शहर आपत्ती व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली आहे. प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे पदसिद्ध अध्यक्ष आहेत. अतिरिक्‍त आयुक्‍त नितीन देसाई सहअध्यक्ष, तर उपायुक्‍त रविकांत आडसूळ सदस्य सचिव आहेत. समितीत 12 अधिकार्‍यांचा समावेश करण्यात आला आहे. सर्व अधिकार्‍यांना आपत्ती व्यवस्थापनसंदर्भात कामे विभागून देण्यात आली
आहेत.

छत्रपती शिवाजी मार्केट विभागीय कार्यालय कार्यक्षेत्र

डी वॉर्ड, शिंगणापूर नाका, गवत मंडई, लक्षतीर्थ वसाहत, पंचगंगा तालीम परिसर, जामदार क्लब व इतर, सिद्धार्थनगर, सीता कॉलनी, लक्ष्मीपुरी, चावरेकर माळ, मोकाशी पॅसेज, रिलायन्स मॉलजवळ कामगार चाळ, लक्ष्मीपुरी, बी वॉर्ड मंडलिक वसाहत, बुद्ध गार्डन, शास्त्रीनगर, गोमती नाला ते यशवंत
आर्यन परिसर.

राजारामपुरी विभागीय कार्यालय

सुतारवाडा, शाहू पूल ते चित्रदुर्ग मठ पिछाडी भाग, व्हिनस कॉर्नर चौक, दीप्ती कॉम्प्लेक्स, बसंत-बहार रोड, डायना पार्क, हरीपूजानगर, राजहंस प्रिटिंग प्रेस परिसर, महावीर गार्डन परिसर, लवकुश अपार्टमेंट व परिसर, शाहूपुरी 8 व 9 वी गल्‍ली, कुंभार वसाहत आठवडा बाजार.

गांधी मैदान विभागीय कार्यालय

रामानंदनगर पूर परिसर, ओढ्याकाठची घरे, खंडोबा मंदिर परिसर.

छत्रपती ताराराणी मार्केट विभागीय कार्यालय

रमणमळा व न्यू पॅलेस परिसर, दीप्ती पार्क, पिनाक प्रसाद अपार्टमेंट व परिसर हरिपूजानगर परिसर, पोवार मळा, भोसले मळा, कोळी कॉलनी, कारदगे पार्क, रमणमळा झोपडपट्टी, शुगर मिल परिसर, शिये नाका रोड, बापट कॅम्प व जाधववाडी परिसर, साळोखेनगर, भोसले पार्क, महालक्ष्मीनगर, कदमवाडी, राजीव गांधी वसाहत, शिरोली जकात नाका परिसर.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news