कोल्हापूर : 2 लाख 90 हजार बालकांना पोलिओ डोस

कोल्हापूर : 2 लाख 90 हजार बालकांना पोलिओ डोस
Published on
Updated on

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

पोलिओ निर्मूलनासाठी जिल्ह्यार रविवारी राबविण्यात आलेल्या पल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत शून्य ते पाच वर्षे वयोगटातील 3 लाख 7 हजार 445 बालकांपैकी 2 लाख 90 हजार 45 बालकांना पोलिओचे डोस देण्यात आले. भुदरगड, गडहिंग्लज, कागल व शिरोळ तालुक्यातील शंभर टक्के बालकांना डोस देण्यात आले.

सकाळी छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमास आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. दुर्गादास पांडे, अधिष्ठाता डॉ. दीक्षित, प्रभारी जिल्हा शिल्यचिकित्सक डॉ. विलास देखमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, सेवा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. उमेश कदम यांच्यासह सीपीआर मधील वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

या मोहिमेत जिल्ह्यातील 3 लाख 7 हजार 445 बालकांना 2 हजार 369 केंद्रांवर लस देण्याची व्यवस्था करण्यात आली होती. त्यासाठी 6 हजार 48 कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज 2 लाख 91 हजार 817 बालकांना डोस देण्यात आले. लसीकरणामध्ये शहराची टक्केवारी कमी आहे. ग्रामीण भागात 97 टक्के बालकांना, शहरामध्ये 91 टक्के तर नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्रातील 91 टक्के बालकांना पोलिओचा डोस देण्यात आला. पाच वर्षांवरीलही 1772 बालकांना डोस देण्यात आले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news