कागलमधील विकासकामांचा आ. हसन मुश्रीफ यांच्या हस्ते प्रारंभ

कागलमधील विकासकामांचा आ. हसन मुश्रीफ यांच्या हस्ते प्रारंभ

Published on

कागल ; पुढारी वृत्तसेवा : कागलमधील उपनगरांमध्ये रस्ते खडीकरण, डांबरीकरण व मजबुतीकरणासह गटारी, भूमिगत गटारी व विद्युतीकरण या विकासकामांचा प्रारंभ आमदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाला. मुश्रीफ यांच्या प्रयत्न आणि पाठपुराव्यातून या कामांसाठी पाच कोटी 75 लाखांचा निधी मंजूर झाला आहे.

कागल शहराच्या वाढत्या विस्तारीकरणामुळे व विकासामुळे शहरात वास्तव्यासाठी येणार्‍या नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. या उपनगरांमधील रस्ते, गटारी, भूमिगत गटारी व विद्युतीकरण या कामांची नागरिकांकडून मागणी होती. या निधीअंतर्गत खडीकरण, डांबरीकरणासह मजबुतीकरणाचे काम, भूमिगत गटारी व विद्युतीकरण होणार आहे.

यावेळी ज्येष्ठ नगरसेवक चंद्रकांत गवळी, माजी नगराध्यक्ष भैया माने, माजी नगराध्यक्ष अजित कांबळे, नगरसेवक प्रवीण काळबर, अस्लम मुजावर, सुनील माने, इरफान मुजावर, शहानुर पखाली आदी प्रमुख उपस्थित होते.

सर्वांगसुंदर कागल

आ. मुश्रीफ म्हणाले, सर्व सोयी-सुविधांनी युक्त असे कागल शहर बनले आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासह या शहराला स्वच्छ व मुबलक पाणीपुरवठ्यासह स्वच्छ, सुंदर ठेवण्याला नेहमीच प्राधान्य दिले आहे. कागल शहर 'सर्वांगसुंदर कागल' म्हणून नेहमीच आघाडीवर असेल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news