

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
काँग्रेसने 370 कलम रद्द निर्णयाचे स्वागत करावे, आपण रामवंशज असल्याचे मान्य करावे, काश्मीरमधील वस्तुस्िथती मान्य करा, मगच त्यांचे हिंदुत्व सिद्ध होईल. त्यामुळे हिंदुत्ववादी मतदारसंघात लढण्यासाठी काँग्रेसने हिंदुत्व सिद्ध करून दाखवावे, असे आव्हान भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना दिले.
2009, 2014 आणि 2019 मध्ये शिवसेनेची परंपरागत 70 ते 75 हजार मते आहेत. या मतदारांना काँग्रेसला मतदान करण्याची सवय लागल्यास 2024 मध्ये ती मते परत आणता येतील का? सतेज पाटील हे पूर्ण तंबू उघडून घेऊन जातात. याचा शिवसैनिकांनी विचार करावा. पाटील म्हणाले, अविश्वासाने आलेले सरकार व मुख्यमंत्रिपद टिकविण्यासाठी शिवसैनिकांना त्याग करा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. मुख्यमंत्रिपद माझं टिकवा, त्याग तुम्ही करा, असे आवाहन मुख्यमंत्री करीत आहेत.
नव्या प्रयोगात मुख्यमंत्रिपद टिकविताना विजय शिवतारे, राजेश क्षीरसागर, चंद्रदीप नरके यांचा बळी देणार का? असा सवाल करून ते म्हणाले, 2014 मध्ये भाजपने युती तोडली नाही. भाजपने युती तोडली होती तर तुम्ही सत्तेत कसे बसलात? पर्याय नव्हता, शिवसैनिक राहिले नसते, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला. यावेळी केशव उपाध्ये उपस्थित होते.