‘एआयएफएफ’च्या माध्यमातून फुटबॉलचा विकास

‘एआयएफएफ’च्या माध्यमातून फुटबॉलचा विकास
Published on
Updated on

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनच्या माध्यमातून (एआयएफएफ) गट-तट विसरून केवळ फुटबॉल विकासासाठी भविष्यातील वाटचाल असणार आहे. याबाबतचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले असून, त्याची प्रभावी अंमलबजावणीही सुरू झाली असल्याची माहिती 'एआयएफएफ'चे सदस्य मालोजीराजे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

राज्य संघटनेसाठी 10 कोटींची तरतूद

'एआयएफएफ'च्या बजेटमध्ये राज्य संघटनांसाठी 10 कोटींची विशेष तरतूद करण्यात आली आहे. येत्या महिन्याभरात प्रत्येक राज्याला 25 लाखांचा निधी देण्यात येणार आहे. यातून कार्यालय, आवश्यक साधनसामग्री, कर्मचारी, स्पर्धा व प्रशिक्षणाचे नियोजन केले जाणार आहे. राज्य संघटनांच्या अडचणी समजून घेण्यासाठी समितीतर्फे राज्यांचे दौरे करून संघटनेच्या भेटी घेण्यात येणार आहेत. 5 राज्यांचा दौरा पूर्ण झाल्याची माहिती मालोजीराजे यांनी दिली.

देशाचा फुटबॉल सुधारण्यासाठी उपक्रम

जागतिक पातळीवरील फुटबॉलमध्ये भारताचे स्थान 106 व्या क्रमांकावर आहे. ते सुधारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न होणार आहेत. ग्रासरूट, प्रशिक्षक व पंच प्रशिक्षण, महिला व पुरुष फुटबॉलपटूंना समान संधी, महिला फुटबॉल विकास यासह विविध योजना राबविण्यात येणार आहेत.

कोल्हापूरसाठी विशेष प्रयत्न

महाराष्ट्र राज्यात कोल्हापूरचा फुटबॉल सदैव मध्यस्थानी असणार आहे. याची सुरुवात या वर्षीपासूनच होत आहे. छत्रपती शाहू स्टेडियमवर दि. 7 ते 15 जानेवारी या कालावधीत संतोष ट्रॉफी फुटबॉल स्पर्धेचे सामने होणार असून, याची जय्यत तयारी केएसएतर्फे करण्यात आल्याची माहिती मालोजीराजे यांनी दिली.

खेळाडूंना रेल्वे प्रवासात विशेष सूट मिळावी, यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच केएसएचे चिफ पेट्रन शाहू महाराज यांच्या अमृत महोत्सवानिमित्त 8 ते 12 वयोगटातील मुलांसाठी ट्रेनिंग अ‍ॅकॅडमी सुरू करण्याबरोबरच अनेक वर्षे बंद असणारी शाहू गोल्डकप स्पर्धा पूर्ववत सुरू केली जाईल.

छत्रपती शाहू स्टेडियमवरील मैदानाच्या विकासासाठी तज्ज्ञ महेश पाटील यांची नेमणूक करण्यात आली आहे. केएसए लीगसाठी 'एआयएफएफ'चे पदाधिकारी कोल्हापुरात उपस्थित राहणार असल्याची माहिती मालोजीराजे यांनी यावेळी दिली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news