

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
गेल्या आठवडाभरात सातत्याने कोल्हापूरच्या तापमानात चढ-उतार होत असून, किमान तापमानातही झपाट्याने वाढ झाली आहे. वाढत्या उष्म्यामुळे कोल्हापूरकर अक्षरश: हैराण झाले आहेत. रविवारी पारा 37 अंशावर, तर आद्रर्र्ता 83 इतकी नोंदविली गेली. उन्हाच्या तीव— कडाक्यामुळे नागरिक घामाघूम झाले होते.
गेले दोन दिवस सकाळी उन्हाचा कडाका आणि सायंकाळी ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. मात्र, रविवारी जिल्ह्याच्या काही भागांत पाऊस झाला असला तरी शहरात उष्मा जाणवत होता. उन्हाची तीव—ता वाढल्याने अनेक नागरिकांनी दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे टाळले. येणार्या आठवड्यामध्ये तापमान 37 ते 39 अंशांपर्यंत राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.