कोल्हापूर; प्रवीण मस्के : विज्ञान-तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) हा वारंवार चर्चिला जाणारा विषय बनला आहे. आरोग्यसेवा, शिक्षण किंवा आपत्ती निवारण यासारख्या क्षेत्रांमध्ये 'एआय' वरदान ठरत आहे.
शिवाजी विद्यापीठाने शिक्षण मंत्रालय दिल्ली यांच्या अर्थसहाय्यातून 'पंडित मदन मोहन मालवीय नॅशनल मिशन ऑन टीचर्स अँड टीचिंग' योजनेंतर्गत 2018 रोजी फॅकल्टी डेव्हलपमेंट सेंटर इन सायबर सिक्युरिटी व डेटा सायन्सची स्थापना केली आहे. विद्यापीठ संलग्न कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यातील दहा महाविद्यालयांत एम. एस्सी. अंतर्गत व एमसीए व पीजी डिप्लोमा इन डेटा सायन्स अभ्यासक्रमांच्या माध्यमातून 'एआय' हा विषय शिकवला जात आहे. यामध्ये डीप ड्युल नेटवर्क, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग, मशिन लर्निंग यांचा समावेश आहे. कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतही उपयोग केला जात आहे. नियोजन व योग्य अंमलबजावणी केल्यास लोकांच्या जीवनात लक्षणीय सुधारणा करण्याची 'एआय'मध्ये क्षमता आहे.