आजर्‍याची लेक बनली कोल्हापूरची पहिली महिला आमदार

जयश्री जाधव
जयश्री जाधव
Published on
Updated on

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

आजर्‍याची लेक श्रीमती जयश्री चंद्रकांत जाधव यांनी कोल्हापूरच्या पहिल्या महिला आमदार बनण्याचा मान मिळविला आहे. सर्वसामान्य नगरसेविका ते विधानसभा सदस्य असा त्यांचा यशस्वी प्रवास थक्क करणारा आहे.

आजरा माहेर असलेल्या जयश्री जाधव डॉ. शंकरराव मोरे यांच्या कुटुंबात सात भावंडांमध्ये करड्या शिस्तीत वाढल्या. वडील शंकरराव डॉक्टर होते. शिक्षण पूर्ण झाल्यावर समाजकार्यात ठसा उमटविणार्‍या जाधव कुटुंबाच्या त्या सून बनल्या. पती चंद्रकांत जाधव व दीर संभाजी जाधव यांचा कोल्हापूरशी मोठा जनसंपर्क असल्याने घरी येणार्‍या-जाणार्‍यांचा मोठा राबता होता. 25 वर्षे एका मोठ्या कुटुंबात वावरताना मुलगा सत्यजित व मुलगी चेतना यांचा सांभाळ करत त्यांनी अनेक जबाबदार्‍या हिमतीने पार पाडल्या. जनसंपर्क व नागरी समस्यांची जाण असणार्‍या जयश्री जाधव सम—ाटनगर प्रभाग क्र.63 मधून 2015 मध्ये निवडून आल्या. प्रभागात रस्ते, पाणी या नागरी सुविधा उपलब्ध करून दिल्या. ग्रामीण भागाशी नाळ जोडलेली असल्याने शेतकर्‍यांच्या भाजीपाल्याचा चांगला भाव मिळावा म्हणून थेट ग्राहकांपर्यंत भाजीपाला विकण्यासाठी आठवडा बाजार सुरू केला.

महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी, स्वत:च्या पायावर उभे राहावे, यासाठी जिल्हा उद्योग केंद्रामार्फत व्यवसाय सुरू करण्यासाठीउद्योगाचे प्रशिक्षण दिले. काही महिलांना उद्योग उभारणीसाठी बँकेकडून कर्जदेखील मिळवून दिले. प्रभागात वाचनालय, विरंगुळा केंद्र, व्यायामशाळा, सांस्कृतिक हॉल बांधला. नगरसेविका म्हणून मिळालेले मानधन स्वत:साठी खर्च न करता त्यांनी परिसरातील गुणवंत व होतकरू विद्यार्थ्यांचा सत्कार करत त्यांना प्रोत्साहन दिले. मुलींना स्वसंरक्षणाचे धडे, परिसरातील मुलांना मैदानी खेळ, युद्धकला यांचे मोफत प्रशिक्षण दिले.

आ.चंद्रकांत जाधव यांच्या मृत्यूनंतर झालेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपला धूळ चारली. राजर्षी शाहू महाराज व महाराणी ताराराणी यांच्या कोल्हापुरात नारी शक्ती दाखवून देत मी बिचारी नाही तर खंबीर असल्याचे त्यांनी दाखवून दिले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news