हातकणंगले येथे अपघातात युवतीचा मृत्यू

हातकणंगले येथे अपघातात युवतीचा मृत्यू
Published on
Updated on

हातकणंगले, पुढारी वृत्तसेवा : हातकणंगले-पेठवडगाव रस्त्यावर जीपने मोपेडला धडक दिल्याने झालेल्या अपघातात महाविद्यालयीन युवती शीतल महेश माळी (वय 19) जागीच ठार झाली, तर सानिया संतोष भोसले (वय 19, दोघी रा.कुंभोज) गंभीर जखमी झाली.

शीतल व सानिया हातकणंगले येथील महाविद्यालयात कला शाखेच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेतात. सकाळी मोपेडवरून (एम एच 09 जी एल 6148) महाविद्यालयाकडे जात असताना हातकणंगले येथील कलासंगम प्रिंटिंग प्रेससमोर हातकणंगलेकडून वडगावच्या दिशेने जनरेटर घेऊन दत्ता चंदुरे हा जीप (एम एच 09 ए बी 3899) वेगाने घेऊन जात होता. त्याची मोपेडला समोरून जोरदार धडक बसली. त्यात मोपेडवरील शीतल व सानिया रस्त्यावर जोरदार आपटल्या.

शीतलच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने ती जागीच ठार, तर सानिया गंभीर जखमी झाली. तिच्यावर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. या प्रकरणी जीपचालक दत्ता चंदुरे (वय 58, रा. कबनूर) याच्याविरोधात गुन्हा नोंद झाला आहे. हातकणंगले ग्रामीण रुग्णालय येथे विच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. यावेळी नातेवाईकांनी आक्रोश केला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news