जागतिक त्सुनामी जनजागृती दिन विशेष |...तर महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीला त्सुनामीचा धोका!

tsunami threat to maharashtra western coastline- अरबी समुद्रात शक्तिशाली भूकंप झाल्यास परिणाम शक्य; १९४५ च्या भूकंपावर आधारित भारतीय हवामान विभागाचा अंदाज
tsunami wave
tsunami wavePudhari
Published on: 
Updated on: 

कोल्हापूर : आशिष शिंदे

अरबी समुद्राच्या पोटात दडलेल्या भूकंपप्रवण मकरान क्षेत्रातील एखादा शक्तिशाली भूकंप महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीसाठी त्सुनामीचे संकट निर्माण करू शकतो. पाकिस्तान आणि इराणच्या जवळ अरबी समुद्रात असलेल्या मकरान सबडक्शन झोनमध्ये मोठा भूकंप झाल्यास त्यातून निर्माण होणाऱ्या त्सुनामीच्या लाटा महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर धडकू शकतात, अशी भीती संशोधकांनी व्यक्त केली आहे. भारतीय हवामान विभागाच्या वैज्ञानिक संगणकीय मॉडेलिंगनुसार, अशी संभाव्य त्सुनामी मुंबईच्या किनाऱ्यावर सुमारे चार तास ४५ मिनिटांत पोहोचू शकते. या लाटेची संभाव्य उंची दोन मीटरपर्यंत असू शकते.

त्यामुळे समुद्र शांत दिसत असला, तरी त्याच्या पोटातील भूगर्भीय हालचाली महाराष्ट्राच्या किनारपट्टीसाठी संभाव्य धोक्याची घंटा ठरू शकतात. जागतिक त्सुनामी जागरूकता दिनाचा घेतलेला हा आढावा.

महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील संभाव्य धोका अधोरेखित करणारा महत्त्वाचा अभ्यास भारतीय हवामान विभागाने केला आहे. या संशोधनात १९४५ मध्ये मकरान सबडक्शन झोनमध्ये झालेल्या ८.१ तीव्रतेच्या भूकंपामुळे निर्माण झालेल्या त्सुनामीचे संगणकीय मॉडेलिंग करण्यात आले. या मॉडेलच्या आधारे समुद्रातील लाटांचा प्रवास, संभाव्य आगमन वेळ आणि लाटांची उंची यांचा अभ्यास करण्यात आला. या मॉडेलिंगमध्ये मुंबईच्या किनाऱ्यावर त्सुनामी लाट सुमारे चार तास ४५ मिनिटांत पोहोचून तिची संभाव्य उंची दोन मीटरपर्यंत असू शकते, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. गोव्याच्या किनाऱ्यावर त्सुनामी लाट सुमारे तीन तास आठ मिनिटांत, कारवार येथे तीन तास १२ मिनिटांत, तर मंगळूर येथे तीन तास ३६ मिनिटांत पोहोचण्याचा अंदाज आहे. या ठिकाणी लाटेची संभाव्य उंची सुमारे एक मीटर दर्शविण्यात आली आहे.

रत्नागिरीतही ऐतिहासिक त्सुनामीचे भूगर्भीय संकेत

रत्नागिरीतील केळशी येथे समुद्राच्या भरतीच्या उच्च पातळीपासून तीन मीटर उंचीवर ३० ते ४० सेंटीमीटर जाडीचा शंख, शिंपलेयुक्त गाळ आढळला. त्याचे कालमापन १५०८ ते १६८१ दरम्यानचे आहे. हे पुरावे १५२४ मध्ये दाभोळ आणि खंबातच्या आखातात समुद्रात झालेल्या असामान्य हालचालींच्या ऐतिहासिक नोंदी पोर्तुगीजांच्या ऐतिहासिक नोंदींशी सुसंगत असल्याचे संशोधकांनी नमूद केले आहे.

tsunami wave
Shivsena support Kolhapur close protest |तोडगा न निघाल्यास ‘कोल्हापूर बंद’मध्ये शिवसेना ताकतीने सहभागी होणार!

काय आहे मकरान भूकंपप्रवण क्षेत्र?

मकरान भूकंपप्रवण क्षेत्र हे अरबी समुद्राच्या उत्तरेकडील पाकिस्तान आणि इराणच्या किनारपट्टीजवळ असून, येथे अरबी टेक्टॉनिक प्लेट युरेशियन प्लेटच्या खाली सरकत असल्याने शक्तिशाली भूकंप होण्याची शक्यता असते. हे क्षेत्र प्रशांत महासागरातील 'रिंग ऑफ फायर 'प्रमाणे सतत भूकंप होणारे क्षेत्र नसले, तरी १९४५ मध्ये येथे झालेल्या ८.१ तीव्रतेच्या भूकंपामुळे त्सुनामी निर्माण झाली होती.

tsunami wave
Kolhapur Air Pollution | कोल्हापूर शहरातील हवा आरोग्यासाठी बनली डेंजर!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.