जागतिक परिचारिका दिन विशेष : रुग्णसेवेचा कणा होतोय कमकुवत

जागतिक परिचारिका दिन विशेष : रुग्णसेवेचा कणा होतोय कमकुवत
Published on
Updated on

कोल्हापूर; पूनम देशमुख :  आजाराने खचलेल्या रुग्णांसाठी उपचाराइतकेच सुश्रुषेला महत्त्व असते. पण सीपीआर रुग्णालयांतर्गत असणार्‍या मेडिकल कॉलेजमधील परिचारिकांची संख्या मागील अनेक वर्षांपासून शासनाच्या उदासीनतेमुळे स्थिर आहे.

वैद्यकीय क्षेत्रात महत्त्वाची भूमिका पार पाडणार्‍या परिचारिकेच्या कामांचे स्वरूप पुरते बदलले आहे. रुग्णालयात रुग्ण दाखल झाल्यापासून ते अगदी अतिदक्षता विभागातील गंभीर रुग्णांना नवसंजीवनी देण्याची मुख्य जबाबदारी त्या पेलत असतात. छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय अर्थात सीपीआरमध्ये आजघडीला 550 परिचारिका असून, अद्याप त्यामधील 150 पदे रिक्त आहेत. तर दुसरीकडे नर्सिंग कॉलेज सुरू झाल्यापासून तीन कोर्सेसकरिता दरवर्षी 20 ही प्रवेशसंख्या कायम आहे.

सीपीआरअंतर्गत नर्सिंग कॉलेजध्ये एएनएम म्हणजे सहायक नर्स मिडवाईफ, जीएनएम म्हणजे जनरल नर्सिंग अँड मिडवाईफ तसेच एलएचव्ही हे नर्सिंगचे कोर्सेस उपलब्ध आहेत. तीन, दोन आणि सहा महिने असे अनुक्रमे या कोर्सेसचा कालावधी आहे. या कोर्सेसकडे मुलींचा कल वाढत आहे.

फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांची शपथ घेऊन परिचारिका या क्षेत्रात पाऊल टाकतात. त्यांच्याप्रमाणेच निस्वार्थ सेवेचे व—त त्या अंगीकारत आहेत. जागतिक पातळीवर साजर्‍या होणार्‍या या दिवसाची यंदाची थीम आहे 'आमच्या परिचारिका आमचे भविष्य'.
– प्रा. सुशीला लांबा, सावित्रीबाई फुले कॉलेज ऑफ नर्सिंग

शेंडापार्क येथे नव्याने उभारण्यात येणार्‍या कॉलेजमध्ये बी.एस्सी. नर्सिंग कोर्सेस सुरू करावेत, याची मागणी करण्यात आली आहे. मात्र, अद्यापही त्याबाबत ठोस निर्णय झालेला नाही .
– प्राचार्य डॉ. सरिता कदम (सीपीआर ट्रेनिंग कॉलेज ऑफ नर्सिंग)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news