जागतिक अल्झायमर दिन विशेष : स्मृतिभ्रंश, विसरभोळेपणा वाढतोय

जागतिक अल्झायमर दिन विशेष : स्मृतिभ्रंश, विसरभोळेपणा वाढतोय
Published on
Updated on

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  जागतिक अल्झायमर दिन दि. 21 सप्टेंबर रोजी जगभरात साजरा केला जातो. अल्झायमर हा एक मेंदूचा विकार आहे, त्यामुळे स्मृतिभ्रंश होतो. विसरभोळेपणा वाढतो. दिवसेंदिवस अशा व्यक्तींची संख्या वाढत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अल्झायमर हा डिमेन्शियाचा एक प्रकार आहे. त्याचे निदान करणे आव्हानात्मक आहे. हा आजार पूर्ववत न करता येणारा स्मरणशक्तीशी संबंधित आजार आहे.

कारणे ः अल्झायमर आजारामध्ये मेंदूचा आकार लहान होत जातो. मेंदूच्या पेशी मरतात. पेशीमधील न्यूरोट्रान्समीटर कमी होतात. 60 वर्षांपेक्षा मोठ्या व्यक्तींना अल्झायमर्स होतो; पण त्याची सुरुवात 40 ते 50 व्या वर्षापासून होते. स्त्रियांना हा आजार अधिक असल्याचे दिसून येते. अनुवंशिक व कौटुंबिक इतिहास असेल तर हा आजार होण्याची शक्यता असते. डोक्याला दुखापत, डाऊन सिंड्रोम, उच्च रक्तदाब, मधुमेह, उच्च कोलेस्ट्रॉल, मेंदूचे विकार, धूम—पान ही कारणे आहेत.

लक्षणे ः स्मरणशक्ती कमी होणे हे प्रमुख लक्षण आहे. अल्झायमर आजाराची लक्षणे हळूहळू वाढत जातात. संभाषणे किंवा घटना विसरणे. घरातल्या घरात वस्तू हरवणे. नियोजन किंवा आयोजनात अडचण. दिशा भटकणे, हरवून जाणे, विचार व्यक्त करण्यात किंवा संभाषणामध्ये भाग घेण्यास अडचण. योग्य शब्द आठवत नाही. व्यक्तीला ओळखतो; पण नाव आठवत नाही. चिडचिड , अस्वस्थता, राग, संशयास्पदता, भास, नैराश्य, कामात रस नसणे, अवलंबून राहावे लागते.

उपचार ः अल्झायमरचा पूर्ण उपचार उपलब्ध नाही; पण विस्मरणाची गती कमी व्हावी, वर्तन दोष कमी यावेत यासाठी औषधे उपलब्ध आहेत. त्यासाठी मानसोपचार डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. नियमित व्यायाम, सकस आणि ताजे अन्न खाणे, साखर, मीठ व स्निग्ध पदार्थ मर्यादित ठेवावे. फळे, भाज्यांचे सेवन, दैनंदिन डायरीचा वापर, छंद जोपासावेत.

घरात ज्येष्ठ व्यक्ती अल्झायमरची असेल तर दुर्लक्ष करू नका. त्यासाठी शासकीय रुग्णालयात जाऊन उपचार घ्या. जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत उपचारांची सुविधा आहे.
-डॉ. अपर्णा कुलकर्णी

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news