

Dumper hits two-wheeler Woman killed
टोप: डंपरने दुचाकीला धडक दिल्याने व डोक्यावरून डंपरचे चाक जाऊन डोक्याचा चेंदामेंदा होऊन महिला जागीच ठार झाली. ही घटना आज (दि.२५) सायंकाळी पाचच्या सुमारास टोप (ता. हातकणंगले) येथे पुणे - बंगळूरु महामार्गावर घडली.
टोप येथे राष्ट्रीय महामार्गावर उड्डाणपूल निर्मितीचे काम सुरू असल्याने येथे नेहमीच वाहनांची गर्दी असते. आज सायंकाळी पाचच्या सुमारास टोप येथील बस स्टॉपजवळ दुचाकीला डंपरने पाठीमागून धडक दिल्याने दुचाकीवरील महिला खाली पडली. त्याच वेळी या महिलेच्या डोक्यावरून डंपरचे चाक गेल्याने डोक्याचा चेंदामेंदा होऊन ही महिला जागीच ठार झाली.
मृत महिला गोटखिंडी (ता. वाळवा) येथील असून तिचे नाव कांचन शिवाजी गावडे असे असल्याचे घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीवरून समजते. या अपघातामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती.