

शिरोली एमआयडीसी, पुढारी वृत्तसेवा : शिये (ता. करवीर) पंचक्रोशीतील महिला बचतगटाच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या गृहोपयोगी वस्तू, खाद्य पदार्थाचे विक्री व प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. यामध्ये महिलांनी आपल्या घरी बनवलेले शाकाहारी व मांसाहारी खाद्यपदार्थ, लोणचे, पापड, शेतात पिकविलेल्या फळभाज्या यासह कटलरी, घरी बनवलेल्या पिशव्या, दुधापासून बनवलेले पदार्थ बचत गटाच्या माध्यमातून बनवलेल्या वस्तू प्रदर्शनामध्ये मांडल्या होत्या.
यावेळी सरपंच म्हणाल्या की, शिये ग्रामपंचायतीच्या वतीने महिलांसाठी विविध उपक्रम राबवले जातात. या खाद्य महोत्सवात ३५ बचत गटांच्या ९२ स्टॉल वर विक्री व प्रदर्शन भरवण्यात आले असून यापुढच्या काळात गावातील महिलांना सक्षम करण्यासाठी राज्य व केंद्र सरकारच्या योजना महिलांच्या पर्यंत पोहचविण्यात येईल व महिलांनी बनवलेल्या विविध वस्तूंची विक्री करण्यासाठी बाजार पेठ उपलब्ध करणार असल्याचे सरपंच मगदूम यांनी सांगितले . या प्रदर्शनात अडीच ते तीन लाख रुपयांची उलाढाल झाली .