Indian bison attack | गवा रेड्याच्या धडकेत महिला गंभीर जखमी

जंगलातून परतताना दाम्पत्यावर अचानक हल्ला; पती किरकोळ जखमी
Indian Bison
गवारेडाPudhari File Photo
Published on
Updated on

राजेश सातपुते

साळवण : साखरी (ता. गगनबावडा) येथील करवंद काढण्यासाठी जंगलात गेलेल्या दाम्पत्यावर गवा रेड्याने अचानक हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात सोनाबाई दत्तात्रय कांबळे या गंभीर जखमी झाल्या असून त्यांचे पती दत्तात्रय शंकर कांबळे यांना किरकोळ दुखापत झाली आहे.

Indian Bison
kolhapur | गव्याचा दाम्पत्यावर हल्ला; महिला गंभीर जखमी

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सोनाबाई कांबळे व दत्तात्रय कांबळे यांच्यासह काही महिला करवंद काढण्यासाठी जंगल परिसरात गेले होते. घरी परत येत असताना इतर सोबती पुढे निघून गेले. मात्र, पाठीमागे राहिलेल्या या दाम्पत्यावर गवा रेड्याने पाठीमागून अचानक धडक दिली. या जोरदार धडकेत सोनाबाई कांबळे गंभीर जखमी झाल्या. त्यांच्या हाताला जबर मार लागून कोपरापासून हात मोडल्याचे सांगण्यात आले. तसेच डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. दत्तात्रय कांबळे यांनाही किरकोळ मार लागला आहे.

Indian Bison
गव्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी; पाटीलवाडीत खळबळ

घटनेनंतर विलास पाटील, अमर कांबळे पं. स. सदस्य, १०८ चे चालक सतीश कांबळे, आरोग्य विभाग व वन विभागच्या मदतीने तत्काळ मदत कार्य करत दोघांनाही उपचारासाठी कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात हलवले. या घटनेमुळे साखरी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून जंगल परिसरात वाढत्या वन्यप्राण्यांच्या वावराबाबत नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news