Animal attacks on goats Nagaon
वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात येथील मेंढपाळ अनिल पुजारी यांच्या सहा बकऱ्या ठारPudhari

Kolhapur News | नागाव येथे वन्यप्राण्यांचा हल्ला; सहा बकऱ्या ठार

कोल्ह्यासदृश वन्यप्राण्यांच्या कळपाने जाळीत ठेवलेल्या कोकरांवर हल्ला
Published on

Animal attacks on goats Nagaon

नागाव (ता. हातकणंगले) : वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात येथील मेंढपाळ अनिल पुजारी यांच्या सहा बकऱ्या ठार झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. या घटनेत सुमारे ५० हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, नागाव येथील अनिल पुजारी, सदाशिव रानगे, महादेव रानगे व सुनील पुजारी यांच्या सुमारे ३५० मेंढरांचा कळप खतासाठी सुनील आण्णा शिराळे यांच्या शिराळे मळा येथील शेतात गेल्या सात दिवसांपासून ठेवण्यात आला आहे. मंगळवारी सायंकाळी सुमारे ६ ते ७ वाजण्याच्या दरम्यान कोल्ह्यासदृश वन्यप्राण्यांच्या कळपाने जाळीत ठेवलेल्या कोकरांवर हल्ला चढविला. या हल्ल्यात सहा कोकरांचा जागीच मृत्यू झाला.

Animal attacks on goats Nagaon
Kolhapur News : शारंगधर देशमुख-आदिल फरास यांच्यात महापालिकेत हमरीतुमरी

घटनेची माहिती शिवाजी राणगे यांनी यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे यांना दिली. त्यानंतर वाघमोडे यांनी वन विभागाला कळविले. वनपाल कुलदीप कांबळे व पशुसंवर्धन अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. तसेच हेरले येथील पशुवैद्यकीय दवाखान्याचे पशुधन विकास अधिकारी डॉ. प्रवीण नाईक यांनी मृत कोकरांचे शवविच्छेदन केले.

दरम्यान, यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे यांनी घटनास्थळी भेट देऊन संबंधित मेंढपाळांना तात्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी केली. यावेळी डॉ. गोरड, अनिल पुजारी, सदाशिव रानगे, महादेव रानगे, सुनील पुजारी, शिवाजी राणगे आदी मेंढपाळ उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news