Kolhapur News : शारंगधर देशमुख-आदिल फरास यांच्यात महापालिकेत हमरीतुमरी

महापौर, आयुक्तांसमोरच एकमेकांना बघून घेण्याची भाषा; प्रचंड तणाव
Kolhapur Municipal Corporation
Kolhapur municipal corporationPudhari File Photo
Published on
Updated on

कोल्हापूर ः महापालिकेत अतिक्रमण निर्मूलनाच्या बैठकीत शिवसेना गटनेता शारंगधर देशमुख आणि राष्ट्रवादी गटनेता आदिल फरास यांच्यात मंगळवारी (दि. 24) प्रचंड वादावादी होऊन हमरीतुमरी झाली. एकमेकांना बघून घेण्याची भाषा वापरल्याने स्थायी समिती सभागृहात तणावाचे वातावरण झाले होते. महापौर रूपाराणी निकम आणि आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांच्यासमोरच ही घटना घडली.

सुमारे पाच मिनिटे दोघांत सुरू असलेली शाब्दिक खडाजंगी अखेर महापौर निकम यांनाही दोघांवर आरडाओरडा करून थांबवावी लागली. महायुतीत पदांच्या फॉर्म्युल्यावरून वाद सुरू झाला आहे. गेले काही दिवस हा वाद धुमसत आहे. त्याचे पर्यवसान आजच्या वादावादीत झाल्याची चर्चा महापालिकेत सुरू होती. महापौर निकम यांनी कोल्हापूर शहरातील अतिक्रमण विषयी महापालिकेतील पदाधिकारी आणि प्रशासन यांची संयुक्त आयोजित केली होती. आयुक्त के. मंजूलक्ष्मी यांच्यासह उपमहापौर अक्षय जरग, सभागृह नेता मुरलीधर जाधव, विरोधी पक्षनेता राजेश लाटकर, काँग््रेास गटनेता इंद्रजित बोंद्रे, गटनेता देशमुख फरास, शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस निरीक्षक नंदकुमार मोरे आदीसह अधिकारी उपस्थित होते.

अतिक्रमणविषयी बोलताना फरास यांनी इतर विषयांवर बोलणे सुरू केले. त्यावर देशमुख यांनी महापौरांना उद्देशून अतिक्रमणाचा विषय असून इतर विषयांवर बैठक भरकटू नये असे सांगितले. त्यावरून दोघांत वादाला सुरूवात झाली. देशमुख म्हणाले, प्रत्येक विषयात मीच बोलणार, माझेच सगळ्यांनी ऐकायचे हे आम्ही खपवून घेणार नाही, सर्वसाधारण सभेतही तूच बोलत होतास, इतर नगरसेवकांनी बोलायचे की नाही? अशी विचारणा केली. त्यावर फरास यांनी महापौरांची परवानगी घेऊन मी जनतेचे प्रश्न मांडत आहे, तू मला बोलण्याचा अधिकार नाही, असे सांगितले. त्यावरून पुन्हा दोघांत शाब्दीक चकमक उडाली.

तुझ्यासारखी लय बघितल्यात...

देशमुख व फरास दोघेही एकमेकांना तू कोण मला सांगणारा... तुझ्यासारखी लय बघितल्यात... तुला बघून घेतो, अशी भाषा सुरू झाली. त्यानंतर दोघेही एकमेकांना काय बघायचं ते बघ... कुठे येऊ सांग, असे प्रत्युत्तर देऊन इशारा देत होते. दोघेही एकमेकांना आरेतुरेची भाषा वापरून मोठमोठ्याने आरडाओरडा करत होते. महापौर निकम यांनी दोघांनाही तीनवेळा शांत बसण्याची विनंती केली. परंतु, दोघेही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. दोघांच्या शाब्दिक भांडणामुळे सभागृहात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. अखेर महापौर निकम यांनी दरडावून दोघांना शांत केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news