कोल्हापुरकरांच्या नजरा पंचगंगेच्या पाणी पातळीवर

पाणी पातळी वाढीनुसार शहरातील 'हा' भाग होतो जलमय
Rise in water level of Panchganga
पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढPudhari File Photo

कोल्हापूर : पंचगंगेची पाणी पातळी वाढत आहे. राजाराम बंधारा येथे पंचगंगेने ३९ फूट उंची गाठली की, ती इशारा पातळी समजली जाते. पाणी पातळी ४३ फुटांवर गेल्यावर त्याला धोकापातळी असे म्हटले जाते; मात्र २०१९ व २०२१ मध्ये पंचगंगेने थेट ५६ फूट पाणी पातळी ओलांडली होती. या महाप्रलयामुळे शहरवासीयांची त्रेधा उडाली होती. यामुळे ४३ फुटांच्या पुढे पाणी पातळी गेल्यानंतर पुराचे पाणी ज्या नागरी वस्तीत शिरते ती संभाव्य ठिकाणे पुढील प्रमाणे...

पंचगंगा नदी इशारा पातळीच्या दिशेने

जिल्‍हा आणि शहरात गेले दोन दिवस पावसाच्या जोरदार पाऊस आहे. त पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. सध्या पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्यावर पाणी पातळी ३७ फूटांवर पोहोचली आहे. कोल्‍हापूर जिल्‍ह्यातील एकूण ७४ बंधारे सध्या पाण्याखाली गेले आहेत. यामुळे अनेक ठिकाणी रस्‍ते हे वाहतुकीसाठी बंद झाले आहेत. जिल्‍हा आपत्‍ती विभागाकडून नागरिकांच्या सुरक्षेसाठी उपययोजना केल्‍या असून, नदी काठावरील गावे तसेच नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात आल्‍या आहेत. (Kolhapur Rain)

Panchganga
पंचगंगा नदी इशारा पातळीच्या दिशेनेFile Photo

पंचगंगेची पातळी वाढते तेव्हा या भागांत शिरते पुराचे पाणी

  • ४३ फूट : सुतारवाड़ा

  • ४५ फूट : जुन्या शिये नाका ओढ्यावर पाणी येऊन कसबा बावडा रस्ता बंद

  • ४५ फूट : रिलायन्स मॉल पिछाडीस कुंभार गल्ली, कामगार चाळ, कांदा, बटाटा मार्केट शाहूपुरी कोंडा ओळ

  • ४६ फूट ५ इंच : व्हिनस कॉर्नर, व्हिनस टॉकीज ते बर्फ फॅक्टरी रस्ता बंद, नाईक मळा. पोलो ग्राऊंड

  • ४७ फूट २ इंच : पंचगंगा हॉस्पिटल, शुक्रवार  पेठ पश्चिम बाजू

  • ४७ फूट २ इंच : आयडीयल कॉलनी, लक्षतीर्थ वसाहत, सुतार मळा (लक्षतीर्थ वसाहत) व शिंगणापूर रस्ता बंद.

  • ४७ फूट ४ इंच : शाहूपुरी कुंभार गल्ली (शाहूपुरी) मुक्त सैनिक वसाहत, काटे मळा, यशोधा पार्क, मलयगिरी अपार्टमेंट, जाधव वाडी, बापट कॅम्प, कपूर वसाहत.

  • ४७ फूट ५ इंच : रेणुका मंदिर, गुंजन हॉटेल, त्रिंबोली नगर, रेणुकानगर, घाडगे गृहयोग व रेणुका मंदिर पीछाडीस पाणी येते. माळी माळा, मेडिकल कॉलेज बावडा, उलपे मळा, रमण मळा, जावडेकर इमारत, नाईक माळा, पॅलेस पीछाडीस, राजहंस प्रिंटिंग प्रेस, हरीपुजा पुरम, त्रिकोणी बाग ते महावीर कॉलेज रस्ता बंद, केव्हीज पार्क, दीप्ती पार्क, डायमंड हॉस्पिटल, अंतरंग हॉस्पिटल, खानविलकर पेट्रोल पंप ते जिल्हाधिकारी कार्यालय रस्ता बंद. जिल्हाधिकारी कार्यालय ते महावीर कॉलेज व्हाया पाटलाचा वाडा रस्ता बंद. बसंत बहार ते जिल्हाधिकारी कार्यालय रस्ता बंद. भालजी पेंढारकर हॉल परिसर (महावीर गार्डन दक्षिण बाजू) दसरा चौक ते व्हिनस कॉर्नर रस्ता बंद. दुर्गा मंदिर (लक्षतीर्थ वसाहत)

  • ४७ फूट ७ इंच : सुभाष रोड (टायटन शोरूम ते फोर्ड कॉर्नर) रस्ता बंद,

  • ४७ फूट ८ इंच पिनाक : सनसिटी, माळी मळा, माहाविर कॉलेज पिधाडीस, पोलो ग्राऊंड,जावडेकर अपार्टमेंट, ड्रिम वर्ल्डची मागील बाजूस.

  • ४८ फूट : मुक्त सैनिक रिक्षा स्टॉप ते मलयगिरी रस्ता बंद. काटे मळा 1 ते सफायर पार्क रस्ता बंद. मेनन बंगला ते नगरसेवक शेळके घरासमोरील रस्ता बंद.

  • ४८ फूट ५ इंच : विल्सन पूल ते व्हिनस कॉर्नर रस्ता बंद. लक्ष्मीपुरी ते नाईक अँड नाईक कंपनी रस्ता बंद. गवत मंडई रस्ता पश्चिम बाजू पाण्यात.

  • ४८ फूट ८ इंच : शंकराचार्य मठ, पंचगंगा तालीम (जामदार क्लब ते पंचगंगा हॉस्पीटल रस्त्याची पश्चिम बाजू पूर्णपणे पाण्यात) उपा टॉकीज (बी न्यूज ते व्हिनस कॉर्नर रस्ता बंद

    (स्टेशन रोड)

  • ४९ फूट ११ इंच : घोडकेवाडी, मुक्त सैनिक बसाहत पूर्व बाजू, एम.एस.ई.बी. बापट कॅम्प, कदमवाडी गणेश पार्क. ५१ फूट दुधाळी (कोल्हापूर ऑथेपिडीक सेंटर, महाराणा प्रताप हायस्कूल, उत्तरेश्वर गवत मंडई नाका, दुधाळी ग्राऊंड परिसर. ५१ फूट ८ इंच: कोल्हापूर कमान ते टोल नाका रस्ता बंद.

  • ५३ फूट : बसंत बहार ते जिल्हाधिकारी कार्यालय पूर्व भाग पाण्यात. (जिल्हाधिकारी कार्यालय पिछाडीस उमेदपुरी)

  • ५६ फूट ३ इंच : जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अंदाजे ३ ते ४ फूट पाणी होते व जिल्हाधिकारी कार्यालय समोरील.

District Information Office, Kolhapur
प्रशासकीय यंत्रणेला सूचना District Information Office, Kolhapur

वेळेत स्थलांतर करा

संभाव्य पूर परिस्थितीचा विचार करुन जिल्हाधिकारी यांनी प्रशासकीय यंत्रणेला सूचना दिल्या आहेत की, 'स्वयंसेवक व एनडीआरएफची पथके सज्ज ठेवा, पूर परिस्थिती निर्माण झाल्यास नागरिक व जनावरांचे वेळेत स्थलांतर करा, कोणत्याही परिस्थितीत जीवितहानी होता कामा नये, पुराचे पाणी आलेले रस्ते बॅरिकेड्स लावून बंद करा, नागरिकांनी पुराच्या पाण्यात वाहने घालू नयेत'

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news