Kolhapur Flood News | तावडे हॉटेल परिसरात पाणी कधी येते? पंचगंगेची पाणी पातळी किती? डाऊनलोड करा संपूर्ण माहिती

महापुराचे पाणी शहराच्या वेशीवर; जोर कायम राहिल्यास आज काही भागात पाणी येण्याची शक्यता
Kolhapur Flood News | Tawde Hotel kolhapur
तावडे हॉटेल परिसरात पाणी कधी येतेFile Photo
Published on
Updated on

कोल्हापुरात पंचगंग नदीच्या महापुराचे पाणी गुरुवारी शहराच्या वेशीवर आले. पावसाचा जोर कायम राहिल्यास शहरातील काही भागात आज पाणी शिरण्याची भीती आहे. पाणी शिरणाऱ्या परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून, गुरुवारी दुपारपासून पावसाचा जोर वाढल्याने धास्ती वाढली आहे. (Kolhapur City, Tawde Hotel kolhapur)

Kolhapur Flood News | Tawde Hotel kolhapur
Raigad Rain Update | रायगड जिल्ह्यात पावसाचा हाहाकार

पंचगंगेची पाणी पातळी राजाराम बंधाऱ्याजवळ शुक्रवारी दुपारी १२ वाजता ४५ फूट २ इंच झाली असून ५१ फूट ८ इंच पाणी पातळीला कोल्हापूरातील तावडे हॉटेल परिसरात पाणी येते. दरम्यान, कोल्हापूर - राधानगरी, तसेच कोल्हपूर - गारगोटी हे मार्ग पाणी आल्याने पूर्णपणे बंद करण्यात आलेले आहेत, कोल्हापूर-निपाणी महामार्गावर एकेरी वाहतूक सुरु आहे. तर शिवाजी पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला असून पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्यात आली आहे. (Kolhapur Flood News)

Water Level of Panchganga and possible Flood Area PDF.

कोल्हापूर शहरातील पंचगंगेची पातळी आणि पाणी येण्याची संभाव्य ठिकाणे जाणून घेण्यासाठी खाली दिलेली PDF फाईल ओपन करा.

Attachment
PDF
शहरातील पुराचे पाणी येण्याचे ठिकाण
Preview

यंदा नागरिकांची सावध भूमिका

शहरात गुरुवारी सकाळी पावसाने उपडीप दिली. काही काळ सूर्यदर्शनही झाले. दुपारनंतर मात्र पुन्हा पावसाचा जोर वाढला. दुपारपासून रात्रीपर्यंत पावसाची संततधार सुरू होती. पावसाने शहरातील अनेक रस्त्यांना नाल्याचे स्वरूप आले होते. रस्त्यावरून पाण्याचे लोट वाहत होते. सखल भागात अनेक विकाणी पाणी साचले होते. दरम्यान, शुक्रवारी सकाळी पावसाचा जोर कमी झाला होता. पण अद्याप पुराची भीती कायम आहे.

२०१९ आणि २०२१ च्या महापुरात शहरात नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. वाहने, प्रापंचिक साहित्य, दुकानातील साहित्य पाण्यात बुडून मोठे नुकसान झाले होते. महापालिकेनेही सुरुवातीपासूनच लोकांना सावध करण्याची भूमिका घेतली आहे. (Kolhapur Flood Latest Update)

Kolhapur Flood News | Tawde Hotel kolhapur
Kolhapur Flood News : १२ तासांत पंचगंगेची पाणी पातळी १ फूट ४ इंचानी वाढली

स्थलांतरित नागरिकांना महापालिकेकडून सुविधा

शहरात पुराचे पाणी आलेल्या कसबा बावडा उलपे मळा, नागाळा पार्क येथील विन्स हॉस्पिटल परिसर, पंचगंगा तालीम येथील जामदार क्लब परिसर, कदमवाडी, जाधववाडी, मुक्त सैनिक बसाहत परिसर व चित्रदुर्ग मठ या ठिकाणी प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी जाऊन पाहणी केली.

चित्रदुर्ग मठातील स्थलांतरित नागरीकांनी जेवणाचा दर्जा चांगला असावा, अशी मागणी केली. महापालिकेच्या वैद्यकीय पथकाने मठामध्ये तपासणी करुन मोफत औषधे दिली. यावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपआयुक्त पंडित पाटील उपस्थित होते. (Kolhapur Flood News )

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news