

Kolhapur Pimpalgaon Khurd Snake Found
सिद्धनेर्ली : पिंपळगाव खुर्द (ता. कागल) येथे घोणस जातीचा साप एका घराच्या अंगणात आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली. घरामध्ये लहान मुले व वयोवृद्ध महिला असल्याने नागरिकांमध्ये काळजीचे वातावरण पसरले. नागरिकांनी तत्काळ व्हन्नूर (ता. कागल) येथील सर्पमित्र विशाल कांबळे यांना संपर्क करून माहिती दिली.
विशाल कांबळे यांनी घटनास्थळी तातडीने पोहोचून योग्य उपकरणांच्या मदतीने सापाला सुरक्षितरित्या पकडले व त्यानंतर परिसरातील नागरिकांना सापाविषयी माहिती दिली. त्यांनी सापांना न मारता तात्काळ सर्पमित्रांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले.
कांबळे यांनी आतापर्यंत प्रबोधनात्मक कामासह 3000 पेक्षा जास्त साप मानव वस्तीमधून पकडून पुन्हा निसर्गात सोडले आहेत. त्यांनी सापांना न मारता सुरक्षित कसे राहावे, याबाबत ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. वन्यजीव संवर्धनासाठी त्यांनी योगदान दिले आहे.