

पुढारी ऑनलाईन डेस्क: Unseasonal Rain | हवामानातील उष्णता वाढल्याने अंगाची लाही लाही होत आहे. दरम्यान ३० मार्चला मराठी नुतन वर्ष गुढीपाडवा आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने दक्षिण मध्य महाराष्ट्रात वादळी पावसाची शक्यता वर्तवली आहे.
भारतीय हवामान विभागाने आज (दि.२८) दिलेल्या बुलेटीननुसार, शनिवार (दि.२९) आणि रविवार (३०) या दोन्ही दक्षिण मध्य महाराष्ट्रात वादळी पावसाची शक्यता आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्रातील कोल्हापुरातील घाट भाग, कोल्हापूर आणि सांगलीमध्ये शनिवारी (दि.२९) तर कोल्हापुरातील घाट भाग, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि साताऱ्यातील घाट भागात पावसाची शक्यता आहे.
गुरुवारी विदर्भातील अकोला शहराचा पारा राज्यात सर्वाधिक 42.2 अंशांवर गेला होता. यंदाच्या एप्रिल महिन्यातील सर्वोच्च तापमानाची नोंद अकोला येथे झाली. त्यापाठोपाठ पुणे, मालेगाव, बीड, नागपूर, वर्धा या शहरांतही उष्णतेची लाट पसरली आहे.