केंद्रीय गृहमंत्री अमित शहा लवकरच कोल्हापुरात

सीपीआर इमारतीचे भूमिपूजन, जिल्हा बँकेच्या नूतन इमारतीचे त्यांच्या हस्ते उद्घाटन
Union Home Minister Amit Shah in Kolhapur soon
जिल्हा बँकेची नूतन इमारत.Pudhari File Photo
Published on
Updated on

कोल्हापूर : सीपीआर इमारतीचे भूमिपूजन व कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनासाठी कोल्हापुरात येण्याचे निमंत्रण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्वीकारले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती येथे झालेल्या जनसन्मान मेळाव्यात ही माहिती दिली, असे पत्रक पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले आहे.

Union Home Minister Amit Shah in Kolhapur soon
‘सीपीआर’मधील कचर्‍याचे मनपाला वावडे?

दहा हजार वृक्ष लावण्याचे नियोजन

उपमुख्यमंत्री पवार यांनी आपण केंद्रीय मंत्री शहा यांना भेटलो असून, त्यांनी निमंत्रण स्वीकारल्याचे सांगितले. तसेच शेंडा पार्कमधील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात दहा हजार वृक्ष लावण्याचे नियोजन करण्यास आपणास सांगितले आहे, असा निरोपही पवार यांनी आपणास दिला आहे. जुलै महिन्याच्या अखेरीस किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात हा कार्यक्रम होण्याची शक्यता आहे.

Union Home Minister Amit Shah in Kolhapur soon
कोल्हापूर : ‘सीपीआर’मध्ये एमआरआयच्या आशा पल्लवित

सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल

कोल्हापुरात शेंडा पार्कमध्ये 30 एकरांत एक हजार कोटी खर्चाचे 1100 बेडचे अद्ययावत हॉस्पिटल होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते लवकरच भूमिपूजन होणार आहे. या अद्ययावत हॉस्पिटलमध्ये 600 बेडचे सामान्य रुग्णालय व बाह्य रुग्ण विभाग, 250 बेडचे कॅन्सर हॉस्पिटल आणि 250 बेडचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल होणार आहे, अशी महितीही पालकमंत्री मुश्रीफ यांनी या पत्रकाद्वारे दिली आहे.

image-fallback
सीपीआर रूळावर; ट्रॉमा केअर सेंटर लवकरच होणार सुरू

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news