

जयसिंगपूर : महाविकास आघाडीने शिरोळ विधानसभेची उमेदवारी डावल्यानंतर माजी आमदार उल्हास पाटील यांची भूमिका काय? याकडे संपूर्ण शिरोळ तालुक्याचे लक्ष लागून राहिले होते. तसेच हातकणंगले येथे महाविकास आघाडीकडून डॉ.सुजित मिणचेकर यांनाही डावलण्यात आले. त्यामुळे माजी आमदार उल्हास पाटील व डॉ.सुजित मिणचेकर यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश केला
त्यामुळे महाविकास आघाडीची शिरोळ व हातकणंगले या दोन मतदारसंघात मोठी कोंडी झाली असून उबाठा शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. शिवाय जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. रात्री उशिरा राजू शेट्टी यांच्या निवासस्थानी हे दोघेही उपस्थित होते.