

मुंबई : Maharashtra Assembly Polls | महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आपली चौथी यादी जाहीर करीत १४ उमेदवारांची नावे घोषित केली असून यापूर्वी जाहीर केलेल्या यादीतील दोन मतदारसंघांतील उमेदवार बदलले आहेत. यासोबतच काँग्रेसने जाहीर केलेल्या उमेदवारांची संख्या १०१ इतकी झाली आहे.
छत्रपती संभाजीनगर (पूर्व) विधानसभा मतदारसंघात मराठा समाजातील तगडे उमेदवार मधुकर देशमुख यांना जाहीर झालेली उमेदवारी नाकारून लहू शेवाळे यांना उमेदवारी दिल्याने काँग्रेसच्या वर्तुळात संताप व्यक्त केला जात आहे. अंधेरी पश्चिम मतदारसंघात काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. मात्र त्यांनी आपल्याला ही उमेदवारी नको, असे पक्षाला कळविल्यावर माजी आमदार अशोक जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नांदेड उत्तरमधून अब्दुल सत्तार अब्दुल गफूर आणि नालासोपारा येथून संदीप पांडे यांना तिकीट देण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यातील शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात दत्तात्रय बहिरट यांना, तर पुणे कॅन्टोन्मेंट या अनुसूचित जातीसाठी राखीव मतदारसंघात माजी राज्यमंत्री रमेश बागवे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दिलीप माने यांना संधी देण्यात आली आहे.
भगीरथ भालकेंना उमेदवारी पंढरपूर हा राष्ट्रवादीच्या ताब्यातील मतदारसंघ काँग्रेसला मिळाला. येथे काँग्रेसने भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली आहे. भरत भालके यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत भगीरथ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. मात्र त्यांचा भाजपने पराभव केला होता. यानंतर भालके यांनी मध्यंतरी भारत राष्ट्र समितीत प्रवेश करून काही काळ तेथे काम केले होते. सोलापूर दक्षिणमधून माजी आमदार
चंद्रपूरमधून प्रवीण पडवेकर, तर बल्लारपूरमधून संतोषसिंग रावत यांना उमेदवारी देण्यात आली आहे. रावत हे सध्या चंद्रपूर जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष असून ते सुधीर मुनगंटीवार यांच्याविरुध्द लढतील. वरोरा मतदारसंघाच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांनी खासदार झाल्यावर आमदारकीचा राजीनामा दिला होता. आपला भाऊ प्रवीण सुरेश काकडे यांनाच उमेदवारी मिळावी म्हणून त्या अडून बसल्या होत्या. काँग्रेस पक्षाने केलेल्या सर्वेक्षणात या परिसरातील प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ. चेतन खुटेमाटे यांचे नाव आघाडीवर होते. काकडे यांना राजकीय अनुभव काहीही नसून त्यांनी केवळ खा. बाळू धानोरकर व सध्याच्या खा. प्रतिभा धानोरकर यांचे स्वीय सहायक म्हणून काम पाहिले आहे. त्यामुळे त्यांना उमेदवारी देण्यास स्थानिक काँग्रेस नेते व प्रदेश पातळीवरील सर्वच प्रमुख नेत्यांचा तीव्र विरोध होता. मात्र खा. धानोरकर यांच्या दबावामुळे काँग्रेसने त्यांच्या भावाला उमेदवारी दिली. उमरेडमध्ये संजय मेश्राम आणि आरमोरीमधून रामदास मसराम यांना उमेदवारी देण्यात आली.