New Ethanol Policy | केंद्राच्या नव्या इथेनॉल धोरणामुळे साखर उद्योगाचे अर्थकारण बिघडणार; साखर कारखानदारी अडचणीत

New Ethanol Policy | केंद्राचे नवे इथेनॉल धोरण; राजू शेट्टींच्या आंदोलनाला नवे बळ मिळणार
Ethanol Blended Fuel |
Ethanol Blended Fuel | वाहनांना इथेनॉल मिश्रणाचे पर्यायही मिळणार
Published on: 
Updated on: 

कोल्हापूर : राजेंद्र जोशी
अवघ्या काही दिवसांमध्ये सुरू होणाऱ्या देशातील साखरेच्या हंगामामध्ये उसाला प्रतिटन साडेपाच हजार रुपये दर मिळावा, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आपले आंदोलन अधिक तीव्र केले आहे. साखरेचे अर्थकारण तोट्यात निघाल्याने साखर व इथेनॉलला अनुक्रमे प्रतिकिलो ५० रुपये व प्रतिलिटर ८० रुपये भाव मिळावा, यासाठी देशातील साखर कारखानदार एकवटले आहेत. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी केंद्र सरकारने भारतीय साखर उद्योगाला मोठा धक्का दिला.

Ethanol Blended Fuel |
Kolhapur News: कोल्हापूर हादरलं! मंदिरासमोरच ९ वीत शिकणाऱ्या मुलीच्या गळ्यावर अन् दंडावर सपासप वार; हत्येने माणगावात खळबळ

देशातील साखरेची टंचाई व दरवाद रोखण्यासाठी केंद्र सरकारने २०२६-२०२७ या इथेनॉल वर्षासाठी उसाचा रस, साखरेचा पाक आणि बी हेवी मॉॅलसिसपासून इथेनॉल निर्मितीसाठी खरेदी निविदा न मागवण्याचा निर्णय घेतला आहे.

यामुळे गेल्या काही वर्षांत साखर कारखानदारीला आर्थिक बळ देणाऱ्या इथेनॉल निर्मितीचा मार्ग बंद झाला आहे. साहजिकच, उत्पादक आणि कारखानदार या दोन्ही पातळीवर आता संघर्ष्याची चिन्हे अधिक ठळक झाली असून परिस्थिती जैसे थे राहिली, तर देशातील ऊस दराचे आणि साखर कारखानदारीचे अर्थकारण कोलमडण्याचा धोका आहे.

इथेनॉल प्रकल्पासाठी कारखान्यांची मोठी गुंतवणूक
गेल्या काही वर्षांत अनेक कारखान्यांनी इथेनॉल प्रकल्पासाठी मोठी गुंतवणूक केली आहे. उसाच्या रसापासून आणि बी हेवी मॉॅलसिसपासून इथेनॉल निर्मिती थांबल्यास या प्रकल्पांच्या क्षमतेचा वापर आणि आर्थिक व्यवहार्यता प्रभावित होऊ शकते. त्याचा अप्रत्यक्ष परिणाम कारखान्यांच्या अर्थकारणावर आणि शेतकऱ्यांच्या ऊस बिलारावर होणार आहे.

भारतामध्ये सध्या साखरेचा शिल्लक साठा मर्यादित आहे आणि साखरेचा हंगाम उत्पादक आणि कारखानदारांच्या मागणीसाठी पुढे ढकलला जातो. याचा परिणाम बाजारात साखरेचे दर वाढत आहेत. परिणामी देशाच्या महागाई निर्देशांकातही वाढतो आहे. याखेरीज जागतिक स्तरावर इंधनाची दरवाढ आणि वाहतुकीचे प्रश्न जटिल होऊ लागल्याने अन्न सुरक्षिततेचाही प्रश्न उपस्थित झाला आहे.

Ethanol Blended Fuel |
Kolhapur Chitranagari Film City | कोट्यवधी खर्चूनही कोल्हापूर चित्रनगरी दुर्लक्षित! दीड वर्षांनंतरही निर्मात्यांच्या बैठकीला मुहूर्त मिळेना

या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने साखर उद्योगातून ऊर्जा निर्माण करण्याऐवजी अन्न सुरक्षिततेला प्राधान्य देण्यासाठी शुक्रवार नवे इथेनॉल धोरण जाहीर केले. यामध्ये इथेनॉलच्या हमीभावामध्येही कपात करण्यात आली. २०१८ मध्ये केंद्र सरकारने इथेनॉल धोरण जाहीर केल्यानंतर साखर कारखानदारीला इथेनॉलच्या मूल्यवर्धनाची जोड मिळाली आणि साखरेच्या फदातील आंदोलने जवळपास संपली होती.

इथेनॉलच्या या धोरणामुळे देशात प्रतिवर्षी सरासरी ३० लाख मेट्रिक टन साखर इथेनॉलकडे वळवून प्रतिवर्षी सरासरी ३०० कोटी लिटर्स इथेनॉल निर्मिती शक्य झाली. केंद्राच्या हमीभावामुळे कारखान्यांना उत्पादकांची देयके चुकती करणे शक्य झाले. परंतु, आता केंद्राने ही वाटच बंद केल्यामुळे कारखानदारी अडचणीच्या भोवऱ्यात सापडली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news