

जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यातील बेरोजगारी हटवण्यासाठी, उद्योगांना चालना देण्यासाठी औद्योगिक वसाहतीची गरज ओळखून अकिवाट या ठिकाणी औद्योगिक वसाहत उभी करताना येथील रहिवाशांच्या एकाही घराला धक्का न लावता या ठिकाणी औद्योगिक वसाहत निर्माण होईल. भविष्यात या रहिवाशांवर जर कोणी अन्याय करत असेल तर शासन म्हणून आम्ही त्यांची दखल घेऊ, अशी ग्वाही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. येथे जयसिंगपूर शहर आणि परिसरातील उद्योजक व विविध व्यापारी संघटनांचा संवाद मेळाव्यात ते बोलत होते. स्वागत व प्रास्ताविक राजकुमार बलदवा यांनी केले.
ना. सामंत म्हणाले, महायुती सरकार राज्यातील शेतकऱ्यांपासून व्यापारी उद्योजकांना सक्षम बनवण्यासाठी काम करत आहे. राज्यातील उद्योजकांवर व्यापाऱ्यांच्यावर, शेतकऱ्यांच्यावर, डॉक्टर, वकील यांसह विविध क्षेत्रांत काम करणाऱ्यांच्यावर अन्याय होवू देणार नाही. माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळेच दोन हजार कोटींच्या माध्यमातून शिरोळ तालुक्याचा चौफेर विकास आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केला. यावेळी उद्योजक दादासो पाटील चिंचवडकर, असोसिएशनचे सेक्रेटरी सुरेश बिराजे, स्टोन क्रशर असोसिएशनचे अबुबकर डांगे, भाऊसो नाईक, जितेंद्र पाटील, तुषार सुलतानपुरे, विद्याधर कुलकर्णी, यांनी मनोगतातून उद्योजकांच्या समस्या शासनाच्या वतीने सोडवण्याची मागणी केली.
यावेळी सचिव मंगेश चिवटे, शिवसेना शिंदे गटाचे नेते मुरलीधर जाधव, रवींद्र माने, माधुरी टाकारे, शिवाजी जाधव, भाजपचे नेते रामचंद्र डांगे, मुकुंद गावडे, सतीश मलमे, शिवसेनेच्या स्मिता कदम, दशरथ काळे, राकेश खोंद्रे, आसमा पटेल, पराग पाटील, उदय जटाळ, चंद्रकांत मोरे, भोला कागले, दानवाडचे सरपंच डी. सी. पाटील, विश्वास बालीघाटे, प्रकाश झेले, राजेंद्र नांद्रेकर, अॅड. संभाजीराजे नाईक, जयसिंगपूर मर्चेंट असोसिएशनचे अध्यक्ष संजय आवटी, जयसिंगपूर आर्किटेक्ट इंजिनिअर असोसिएशनचे अध्यक्ष अजित मरसुदे, क्रेडाईचे अध्यक्ष राहुल कुंभार, जयसिंगपूर किराणा भुसार असोचे अध्यक्ष मनोज डिगे, जयसिंगपूर कापड व्यापारी असोचे अध्यक्ष अभिषेक गणबावले, केमिस्ट असोचे अध्यक्ष बंडू लडगे, क्रशर असो.चे अध्यक्ष रमेश कलकुटगी, सराफ असो. चे अध्यक्ष नितीन पाटील, टिंबर असो.चे अध्यक्ष धीरज पटेल, उद्योजक उपस्थित होते. आभार निर्मल पौरवाल यांनी मानले.