Cancer Cells : कर्करोग पेशी नष्ट करण्यासाठीच्या संशोधनास जर्मन सरकारचे दोन पेटंट

Cancer Cells : कर्करोग पेशी नष्ट करण्यासाठीच्या संशोधनास जर्मन सरकारचे दोन पेटंट

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : नॅनो संमिश्रे आधारित मटेरियलपासून तयार केलेल्या कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्यासाठीच्या शिवाजी विद्यापीठाच्या प्रा. डॉ. सागर डेळेकर, डॉ. राजेंद्र पाटील, स्वप्नजित मुळीक व अमोल पांढरे यांनी केलेल्या संशोधनास जर्मन सरकारचे दोन पेटंट मिळाले आहेत. यामुळे शिवाजी विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

सुपरपॅरामॅग्नेटिक लोह ऑक्साईड व चिटोसन लेपित लोह ऑक्साईड नॅनोकणाची त्यांनी व्हिव्हो व्यवहार्यता मूल्यांकन (मूत्रपिंड, गिल्स स्नायू ऊती, मेंदू, आणि यकृत), हे सातार्‍यातील 'कावेरी गर्रा' या माशांवर केले आहे. हे नॅनो संमिश्रे गैर-धोकादायक आणि जैवसुसंगत असल्याचे निदर्शनास आले आहे. या संशोधनाचा उद्देश हा ज्या आजारांना कर्करोग म्हणतो त्या रोगांचे उपचार करण्यासाठी आणि शेवटी बरे करण्यासाठी सुरक्षित आणि प्रभावी पद्धती विकसित करणे हा आहे. लक्ष्यित थेरपी, हार्मोनल थेरपी, रेडिएशन थेरपी, शस्त्रक्रिया आणि केमोथेरपी या उपचार पद्धतीला पर्याय म्हणून मॅग्नेटिक हैपेर्थेर्मियाचा उपचार भविष्यात पारंपरिक पद्धतीना पर्याय असू शकतो. या संशोधनाचा लाभ कर्करोग क्षेत्रात कार्यरत असणार्‍या संशोधकांसह कर्करोग समस्यावर उपाय म्हणून ही होणार आहे. या संशोधनामुळे तयार करण्यात येणारी सुपरपरामॅग्नेटिक लोह ऑक्साईड व चिटोसन लेपित लोह ऑक्साईड नॅनोकण हे सध्याच्या कर्करोग क्षेत्रासाठी अनमोल देणगी देणारी ठरतील, असा विश्वास डॉ. डेळेकर यांनी व्यक्त केला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news