भंडारा : ६ वर्षीय विद्यार्थिनीचा शाळेत विजेच्या धक्क्याने मृत्यू

पुयार येथील जि.प. प्राथमिक शाळेतील घटना
electric shock
शाळेत विजेच्या धक्क्याने विद्यार्थींनीचा मृत्यू झाला.Pudhari News Network

भंडारा : शाळा सुरू झाल्यानंतर तिसऱ्याच दिवशी शाळेतील स्वच्छतागृहात गेलेल्या इयत्ता पहिल्या वर्गातील विद्यार्थिनीची विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना लाखांदूर तालुक्यातील पुयार येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बुधवारी (दि.३) सकाळी दहाच्या सुमारास घडली. यशस्वी सोपान राऊत (वय ६ वर्ष, रा.पुयार) असे या मृत विद्यार्थींनीचे नाव आहे.

electric shock
वाढदिवसाला दारू दिली नाही; मित्राचा चौथ्या मजल्यावरून फेकून खून

पुयार येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत सॅनिटरी नॅपकीन डिस्पोज करण्याची मशीन लावलेली आहे. मात्र, या मशीनचा अल्युमिनियम तार खुला असला तरी याकडे येथील मुख्याध्यापकांसह शिक्षकांचे अक्षम्य दुर्लक्ष झाले होते. दरम्यान, बुधवारी यशस्वी ही स्वच्छतागृहात लघुशंकेसाठी गेली असता खुल्या पडलेल्या सॅनिटरी नॅपकीन डिस्पोज करण्याऱ्या मशीनच्या तारेला स्पर्श झाल्याने तिला विजेचा जोराचा धक्का लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.

electric shock
Kolhapur Crime News : राजारामपुरी येथे युवकाचा दगडाने ठेचून खून

दरम्यान, स्वच्छगृहात जाणाऱ्या इतर विद्यार्थिनींना यशस्वी स्वच्छतागृहातील पडलेली दिसली. त्यांनतर त्यांनी ही माहिती शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापकांना दिली. मात्र शिक्षक, मुख्याध्यापकांनी त्या विद्यार्थिनीला तिथेच तसेच ठेवून माहिती देणाऱ्या विद्यार्थ्यांना घरी पाठवले. या घटनेची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरताच ग्रामस्थांसह यशस्वीच्या पालकांनी शाळा गाठली. त्यावेळी यशस्वी स्वच्छतागृहात पडलेली होती. यशस्वीच्या आईवडिलांनी तिला उचलून तात्काळ लाखांदूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी यशस्वीला मृत घोषित केले. या घटनेची माहिती लाखांदूर पोलिसांना मिळताच पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन पवार यांनी पोलिस कर्मचाऱ्यांसह रुग्णालयात धाव घेत घटनेचा पंचनामा केला. पोलिस निरीक्षक सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news